Download App

Uttar Pradesh Loksabha : अयोध्येत भाजपला राम ‘पावला’ नाही, समाजवादीची सायकल ‘सुसाट’…

अयोध्येतून भाजपचे उमदेवार लल्लू सिंह यांचा पराभव झाला असून सपाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांची सायकल सुसाट पळालीयं.

Uttar Pradesh Loksabha : देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Result) जाहीर होत आहे. देशातील अनेक राज्यांत एनडीएला धक्का बसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. असं असतानाच आता उत्तर प्रदेशात अयोध्येतही (Ayodhya) भाजपला राम पावला नसल्याचं दिसून येत आहे. अयोध्येतून भाजपचे उमदेवार लल्लू सिंह (Lallu Singh) यांचा पराभव झाला असल्याचं समोर आलं आहे. तर समाजवाटी पार्टीचे उमेदवार अवधेश प्रसाद (Avdhesh Prasad) यांची सायकल सुसाट पळालीयं. याचवर्षी भाजपने अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला होता. याच मुद्द्यावरुन भाजपने निवडणुकीत मते मागितल्याचं दिसून आलं पण फैजाबाद मतदारांनी त्यांना पसंती दिली नसल्याचं दिसून आलंय.

अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं…

उत्तर प्रदेशातील फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमदेवार ल्लू सिंह हे मतमोजणीच्या सुरुवातीपासून पिछाडीवर होते. या जागेवर भाजपने लल्लू सिंह यांना उमेदवारी दिली होती. लल्लू सिंह यांच्याविरोधात समाजवादी पार्टीचे उमेदवार अवधेश प्रसाद रिंगणात उभे होते. ते 5100 मतांच्या फरकाने मागे होते. लल्लू सिंह 2014 पासून फैजाबादची जागा भाजप जिंकत असून राम मंदिराचा अभिषेक आणि भाजप नेत्यांनी निवडणूक प्रचारात राम मंदिराचा उल्लेख केल्यानंतरही येथील ट्रेंडमध्ये भाजपला धक्का बसल्याचे दिसल्याचं बोललं जात आहे.

ठाण्याचा बालेकिल्ला शिंदेंचाच, ठाकरेंचा शिलेदार राजन विचारे मोठ्या पराभवाकडे, नरेश म्हस्के ठरले जायंट किलर

फैजाबाद मतदारसंघातून इंडिया आघाडीचे उमेदवार अवधेश प्रसाद ट्रेंडमध्ये पुढे आहेत. तर बसपाने सच्चिदानंद पांडे यांना येथून उमेदवारी दिली होती. निवडणुकांदरम्यान राममंदिराच्या मुद्द्याला फारसे महत्त्व मिळालं असल्याचं दिसून आलेलं नाही. दरम्यान, फैजाबाद लोकसभा जागेसाठी २० मे रोजी मतदान पार पडलं. फैजाबाद लोकसभा जागेवर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगलच मताधिक्य मिळालं होतं. भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांनी 65 हजारांहून अधिक मतांनी सपाचे आनंद सेन यादव यांचा पराभव केला होता.

follow us