Union Budget 2024 : रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित योजनांसाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्माला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी या घोषणा केल्या आहेत. (Union Budget) त्यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ उतकृष्ट आहे. (Nirmala Sitharaman) भारताची चलनवाढ स्थिर राहून ४ % च्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे असंही सीतारामन यावेळी म्हणाल्या.
Union Budget 2024 LIVE : अर्थमंत्र्यांचा पिटारा उघडला; कुणाला काय मिळालं?
गरीब तरुण, महिला, शेतकरी, अशा महत्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रोजगार, कौशल्य, एमएसएमई, मध्यमवर्गावर सतत लक्ष केंद्रित केले जात आहे. रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटी रुपयांचं बजेट आहे. यावेळी निर्माला सीतारामन म्हणाल्या भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. तसंच, भारतातील महागाई नियंत्रणात आहे. या अर्थसंकल्पात तरुणांसाठी 2 लाख कोटींची तरतूद करत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.