FIR against Congress for PM Modi AI Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचा एआय व्हिडिओ (AI Video) तयार करणे काँग्रेसला (Congress) भोवले आहे. या प्रकरणी दिल्लीत एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भाजपचे दिल्ली निवडणूक सेलचे संकेत गुप्ता यांनी या प्रकरणी काँग्रेसच्या आयटी सेलवर एफआयआर नोंदविली आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदही राजकीय आखाड्यात? बिहार निवडणुकीत उमेदवार उभे करणार
संकेत गुप्ता यांच्या तक्रारीवरून दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केलीय. हा वादग्रस्त व्हिडिओ काँग्रेस (INC बिहार) च्या अधिकृत हँडलवर 10 सप्टेंबर 2025 रोजी प्रसारित केला होता. हा व्हिडिओ एआय जनरेटेड होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आली होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्यासोबतच हा मातृत्व आणि महिलांच्या प्रतिष्ठेचाही अपमान असल्याची प्रतिक्रिया भाजपची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. (fir against congress leaders for create pm modi and mother ai video delhi police)
नेपाळचे माजी पीएम केपी ओली यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल; नक्की काय घडलं?
भाजपच्या तक्रारीत काय म्हटलंय ?
गेल्या महिन्यात दरभंगा येथे काँग्रेस-राजद मतदार हक्क यात्रेदरम्यान पंतप्रधान आणि त्यांच्या आईविरुद्ध अश्लील टिप्पण्याही करण्यात आली होती. हे प्रकरण गंभीर लक्षात घेऊन पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. आता एआय व्हिडिओप्रकरणी बीएनएसच्या विविध कलमांनुसार, आयटी अॅक्ट आणि डिजिटल डेटा प्रोटेक्शन अॅक्टच्या कलमांखाली गुन्हा दाखल झालाय. सध्या डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे.
AI व्हिडिओवरून राजकारण तापले
या वादामुळे देशभरात राजकारण तापलंय. महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाने काँग्रेसविरुद्ध रस्त्यावर निदर्शने केली. हा व्हिडिओतून मातृशक्तीचा अपमान झाल्याचे भाजपने म्हटले आहे. तर राजदमधून बाहेर पडलेले माजी मंत्री तेजप्रताप यांनीही यावरून काँग्रेसला घेरलंय. काँग्रेस असो वा भाजप, कोणीही राजकीय हेतूंसाठी हा शब्द वापरू नये. आई देवाचे रूप आहे, ती नऊ महिने गर्भात बाळाला बाळगते. त्यामुळे “आई” सारख्या पवित्र शब्दावर राजकारण करणे असंवेदनशील आहे. त्याचा निषेध केला पाहिजे, असे तेजप्रताप यांनी म्हटलंय. भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय की या व्हिडिओने देशातील प्रत्येक आईचा अपमान केला आहे आणि जनता काँग्रेसला कधीही माफ करणार नाही.