Download App

मोठी बातमी! परराष्ट्र मंत्री जयशंकर जाणार पाकिस्तानला, SCO शिखर परिषदेत करणार भारताचे प्रतिनिधित्व

S Jaishankar : इस्लामाबादमध्ये 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत सहभागी

  • Written By: Last Updated:

S Jaishankar : इस्लामाबादमध्ये 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत (SCO Summit) सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) पाकिस्तानला (Pakistan) जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली.

15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये SCO शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी पाकिस्तानने इतर देशांसह भारतालाही आमंत्रित केले होते. SCO मध्ये भारतासह चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचा समावेश आहे. याबाबत माहिती देत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, परराष्ट्र मंत्री जयशंकर इस्लामाबाद येथे 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या SCO शिखर परिषदेमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे.

झिरवळांच्या उडीनं काम तमाम केलं; खडबडून जागे झालेल्या सरकारचा पेसा भरतीवर अखेर तोडगा

या शिखर परिषदेसाठी पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले होते मात्र आता पीएम मोदी पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 2016 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला भेट दिली होती मात्र त्यानंतर भारतीय नेत्यांनी पाकिस्तानला भेट दिली नव्हती. 2016 नंतर आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार आहे. ते शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

follow us