Champai Soren News : झारखंड राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक (Jharkhand Elections) होणार आहे. या निवडणुकीआधी (Champai Soren) राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. तुरुंगातून बाहेर येत पुन्हा मुख्यमंत्री बनलेल्या हेमंत सोरेन यांना (Hemant Soren) धक्का देणारी बातमी आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षातील दिग्गज नेते चंपाई सोरेन (Champai Soren) भाजपात प्रवेश करणार आहेत. चंपाई सोरेन यांनी काही निकटवर्तीयांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. सोरेन येत्या 30 ऑगस्ट रोजी भाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत.
Champai Soren : झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा राजीनामा, हेमंत सोरेनकडे पुन्हा राज्याची धुरा
मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिल्यापासून चंपाई सोरेन पक्षात नाराज होते. चांगले काम करत असतानाही फक्त हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर आले म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून चंपाई सोरेन नाराज होते. ते लवकरच वेगळा निर्णय घेतील असे सांगितले जात होते. मध्यंतरी त्यांनी कोलकाता मार्गे दिल्लीत येत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मात्र त्यांनी भाजप प्रवेशाबाबत काही माहिती दिली नव्हती.
दिल्लीतून परतल्यानंतर त्यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली होती. परंतु, आता पुन्हा राजकारणचं गणित बदललं आहे. चंपाई सोरेन यांचा भाजपातील प्रवेश नक्की झाला आहे. येत्या 30 ऑगस्ट रोजी चंपाई सोरेन भाजपात प्रवेश करतील अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांनी दिली. सोरेन यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सोमवारी रात्री भेट घेतली.
Former Chief Minister of Jharkhand and a distinguished Adivasi leader of our country, @ChampaiSoren Ji met Hon’ble Union Home Minister @AmitShah Ji a short while ago. He will officially join the @BJP4India on 30th August in Ranchi. pic.twitter.com/OOAhpgrvmu
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) August 26, 2024
राजकीय जाणकारांच्या मते चंपई सोरेन जर भाजपात आले तर आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात आदिवासी समजाच्या मतांमध्ये फूट होऊ शकते. झारखंड मुक्ती मोर्चाला मिळणारी आदिवासी समाजाची मते काही प्रमाणात भाजपला मिळू शकतात. परंतु, यामुळे पक्षात गटबाजी वाढण्याचाही धोका आहे. चंपई सोरेन यांचा जमशेदपूरसह कोल्हान भागात मोठा दबदबा आहे. विशेष करून पोटका, घाटशिला, बहरागोडा, ईचागढ, सरायकेला-खरसावां आणि पश्चिम सिंहभूम जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पाठीशी मोठा जनाधार आहे.
2019 मधील लोकसभा निवडणुकीत चंपई सोरेन यांनी जमशेदपूर मतदारसंघातून निवडणूक लढली होती. या आदिवासी बहूल भागात संथाल आणि भूमिज समाजाने झारखंड मुक्ती मोर्चाला समर्थन दिले होते. कोल्हान विधानसभा मतदारसंघात तर जय पराजयाचं अंतर फक्त दहा ते वीस हजार मतांच्या दरम्यानच असतं अशा परिस्थितीत चंपाई सोरेन खरंच भाजपात आले तर त्यांचा पक्षाला फायदाच होणार आहे.
मोठी बातमी! झारखंडात राजकीय भूकंप; तीन आमदारांसह माजी मुख्यमंत्री दिल्लीला रवाना