मोठी बातमी! झारखंडात राजकीय भूकंप; तीन आमदारांसह माजी मुख्यमंत्री दिल्लीला रवाना

मोठी बातमी! झारखंडात राजकीय भूकंप; तीन आमदारांसह माजी मुख्यमंत्री दिल्लीला रवाना

Champai Soren News : विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच झारखंड (Jharkhand Elections) राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन (Champai Soren) झारखंड मुक्ती मोर्चाच्या तीन आमदारांना घेऊन तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. आज दुपारी तीन वाजता दिल्लीतील भाजपा मुख्यालयात चंपई सोरेन भाजपात प्रवेश करतील असे सांगितले जात आहे. चंपई सोरेन यांच्या या खेळीने राज्यातील राजकारण तापलं आहे. दशरथ गगराई, रामदास सोरेन, चमरा लिंडा, लोबिन हेमब्रोम, समीरम मोहंती हे काही नेते नॉट रिचेबल झाले आहेत. म्हणजेच एकूण सहा आमदारांशी संपर्क बंद झाला आहे.

हेमंत सोरेन पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी; राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिली शपथ

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंपई सोरेन सध्या भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपासूनच राज्याच्या राजकारणात चंपई सोरेन मोठा राजकीय निर्णय घेऊ शकतात अशा चर्चा होत्या. आता या चर्चा खऱ्या ठरताना दिसत आहेत. चंपई सोरेन यांनी शनिवारीच आपल्या वाहनांच्या ताफ्याला जमशेदपूर सर्किट हाऊस येथ सोडले होते. पुढे त्यांनी कोलकाता  (Kolkata) गाठले. तेथून पुढे दिल्लीला रवाना झाले. फक्त दोन वाहने सोबत घेत सोरेन दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सर्किट हाऊसमध्ये त्यांच्या ताफ्यातील तीन वाहने अजूनही उभी आहेत. घाटशिलाचे आमदार झामुमोचे जिल्हाध्यक्ष रामदास सोरेन यांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. या फक्त अफवा आहेत. मी पक्षाचा खराखुरा शिपाई आहे. मी आताही पक्षाबरोबर आहे आणि भविष्यात सुद्ध राहिन असे त्यांनी स्पष्ट केले. खरसावाचे आमदार दशरथ गगराई म्हणाले, जर मला कुणी 100 कोटी रुपये दिले तरी मी झामुमो सोडणार नाही. भाजप सातत्याने आमदारांना फोडण्याचे आणि राज्य सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहे. चंपई सोरेन भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे यावर गगराई म्हणाले ते आमचे मार्गदर्शक आहे. त्यामुळे या विषयावर नी काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही.

मोठी बातमी : हेमंत सोरेन तिसऱ्यांदा होणार झारखंडचे मुख्यमंत्री; 7 जुलै रोजी घेणार शपथ

चंपई सोरेनमुळे भाजपला फायदाच

राजकीय जाणकारांच्या मते चंपई सोरेन जर भाजपात आले तर आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात आदिवासी समजाच्या मतांमध्ये फूट होऊ शकते. झारखंड मुक्ती मोर्चाला मिळणारी आदिवासी समाजाची मते काही प्रमाणात भाजपला मिळू शकतात. परंतु, यामुळे पक्षात गटबाजी वाढण्याचाही धोका आहे. चंपई सोरेन यांचा जमशेदपूरसह कोल्हान भागात मोठा दबदबा आहे. विशेष करून पोटका, घाटशिला, बहरागोडा, ईचागढ, सरायकेला-खरसावां आणि पश्चिम सिंहभूम जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पाठीशी मोठा जनाधार आहे.

2019 मधील लोकसभा निवडणुकीत चंपई सोरेन यांनी जमशेदपूर मतदारसंघातून निवडणूक लढली होती. या आदिवासी बहूल भागात संथाल आणि भूमिज समाजाने झारखंड मुक्ती मोर्चाला समर्थन दिले होते. कोल्हान विधानसभा मतदारसंघात तर जय पराजयाचं अंतर फक्त दहा ते वीस हजार मतांच्या दरम्यानच असतं अशा परिस्थितीत चंपाई सोरेन खरंच भाजपात आले तर त्यांचा पक्षाला फायदाच होणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube