Gold Price Today : सोन्याच्या भावात तेजी; महाराष्ट्रात 22 कॅरेट सोन्याचा दर किती?

Gold Price Today :  गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये घसरण सुरु असल्याने सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी पाहायला

Gold Price Today

Gold Price Today

Gold Price Today :  गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये घसरण सुरु असल्याने सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी पाहायला मिळत होती मात्र आता पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहे. आज 28 नोव्हेंबर देशातील अनेक शहरांमध्ये सोन्याच्या किमती वाढल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.  दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,28,560 रुपये इतका आहे. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,28,410 रुपये आहे. जागतिक बाजारपेठेत किमतीत झालेली मोठी वाढ देशांतर्गत बाजारावर परिणाम करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने प्रति औंस 3,639.6 डॉलर्सवर व्यवहार करत आहे. या आठवड्यात जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीत सुमारे 3% वाढ झाली आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर:

दिल्लीतील सोन्याचे भाव:

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 1,28,560 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,17,860 रुपये आहे.

मुंबई आणि कोलकाता:

मुंबई आणि कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,17,710 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,28,410 रुपये आहे.

चेन्नईतील सोन्याचे भाव:

चेन्नईत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,28,410 रुपये आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,17,710 रुपये आहे.

पुणे आणि बेंगळुरू:

या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,28,410 रुपये आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,17,710 रुपये आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेची मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’ व्याजदर वाढवत आहे, वास्तविक परतावा (रिअल यील्ड) उच्च पातळीवर कायम आहे आणि डॉलर अनेक महिन्यांतील उच्चांकी पातळीच्या जवळ व्यवहार करत आहे. जोपर्यंत या परिस्थितीत बदल होत नाही, तोपर्यंत सोन्याच्या किमतीत वाढ होऊन ती 3,750 ते 3,800 डॉलर्सपर्यंत पोहोचल्यास, विक्री करणाऱ्यांना  आकर्षित करू शकते.

गद्दारांची मांदियाळी असताना…, डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांचा पाठिंबा अन् काँग्रेसची इमोशनल पोस्ट 

चांदीची किंमत

सोन्यासोबत चांदीच्या दरातही मोठी तेजी पाहायला मिळत आहे. 28 नोव्हेंबरच्या सकाळी चांदीची किंमत प्रति किलो 1,70,100 रुपये इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट चांदीची किंमत प्रति औंस 43.44 डॉलर्स इतकी आहे.

Exit mobile version