काय सांगता! बँकेच्या मातीला सोन्याचा भाव, खरेदीसाठी उडाली झुंबड; चीनमध्ये काय घडतंय?

काय सांगता! बँकेच्या मातीला सोन्याचा भाव, खरेदीसाठी उडाली झुंबड; चीनमध्ये काय घडतंय?

China News : काही लोक आपल्या जीवनात काही वस्तू अतिशय लकी मानतात. या वस्तू जवळ आहेत म्हणून आपले अच्छे दिन आहेत असेच त्यांना वाटत असते. आपल्या आजूबाजूला असे लोक दिसून येतातच. परंतु, ही बातमी भारतातील नाही. विदेशातही असे लोक आहेत. त्यांच्या या समजूतीचा फायदा घेणारे दुकानदारही तिथे आहेत. याच संबंधात चीनमधून एक (China News) व्हिडिओ समोर आला आहे. येथे बँकेची माती लोकांसाठी लकी ठरत आहे आणि लोक ही माती खरेदी करण्यासाठी पाहिजे तितकी किंमत देण्यासही तयार आहेत.

त्याचं झालं असं की चीनमध्ये सध्या बँकेच्या मातीला भाग्याशी जोडून त्याचा व्यापार केला जात आहे. विशेष म्हणजे ही माती खरेदी करण्यासाठी चीनी लोक वाट्टेल तितके पैसे देण्यासही तयार आहेत. परंतु, या ट्रेंडचा काही जण विरोधही करत आहेत. परंतु, त्यांचा आवाज क्षीण आहे. एससीएमपी नुसार या तथाकथित बँक मातीला दुकानदार 888 युआन म्हणजेच जवळपास 10 हजार 200 रुपयांना विक्री करत आहेत. बँकेत ठेवलेल्या कुंड्या आणि नोटांतून निघणारी ही धूळ (Bank Soil) असल्याचे सांगितले जात आहे. ही खरेदी केल्याने धन आणि सौभाग्य प्राप्त होते अशी धारणा आहे.

Russia China : चीन-रशियाकडून ‘डॉलर’ हद्दपार! द्विपक्षीय व्यापारासाठी तयार केला खास प्लॅन

मिडिया रिपोर्ट्सनुसार एक दुकानदार चार प्रकारच्या मातीची विक्री करत आहे. ही माती पाच मुख्य बँकांतून आणली गेली आहे. अॅग्रीकल्चर बँक ऑफ चायना, चायना कन्स्ट्रक्शन बँक, बँक ऑफ चायना, इंडस्ट्रीयल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना आणि बँक ऑफ कम्यिनिकेशन्स या त्या बँका आहेत. चीनमधील या सर्वात श्रीमंत बँका आहेत. दुकानदाराने असा दावा केला आहे त्याच्याकडे मिळणारी माती याच पाच बँकांतून गोळा करून आणलेली आहे. रिपोर्टवर विश्वास ठेवला तर या मातीचा सर्वात स्वस्त हिस्सा 24 युआन (275 रुपये) मध्ये विकला जात आहे.

आता तुम्ही म्हणाल की लोक असे का करत आहेत तर लोकांचे अशी भावना आहे की या मातीला घरात ठेवल्याने पैशांत वाढ होते तसेच घरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. ही माती दुपारच्या वेळी गोळा केली जाते आणि घरात सौभाग्य आणण्याचा या मातीचा दर 999.999 टक्के आहे असे दुकानदाराचे म्हणणे आहे. या संदर्भात दुकानदारांनी काही व्हिडिओ सुद्धा शेअर केले आहेत. यामध्ये काही लोक बँकेजवळ माती गोळा करताना दिसत आहेत.

China : चीनचा नवा ‘जीएसआय’ उद्योग, पाकिस्तानची चांदी; भारताला मात्र धोक्याची घंटा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube