IPS Deepak Ranjan : बिहारमधील बोधगया येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. (IPS) येथे आपीएस अधिकाऱ्याला त्यांच्याच अंगरक्षकांनी वाटेतच सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आपीएस दीपक रंजन फ्रेश होण्यासाठी वाटेत थांबले होते. त्याच वेळी त्यांचा ड्रायव्हर आणि गार्ड गाडी घेऊन पुढे गेले. या प्रकरणात ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड दोघांनाही निलंबित करण्यात आलं आहे.
आयपीएस दीपक रंजन हे बिहार सशस्त्र सीमा बलच्या तिसऱ्या आणि १७ व्या बटालियनचे कमांडंट आहेत. सध्या ते बोधगया येथे तैनात आहेत. अधिकारी काही कामासाठी पाटण्याला गेले होते आणि तेथून ते त्यांच्या गाडीने बोधगयाला परतत होते. यादरम्यान, रंजन यांना फ्रेश होण्यासाठी जायचे होते. जहानाबादच्या तेहता येथे एक पेट्रोल पंप पाहून त्यांनी गाडी थांबवली आणि फ्रेश होण्यासाठी गेले.
हगवणे बंधू शस्त्र परवान्यात CP ऑफिसमधील बडा अधिकारी?; IG सुपेकरांनी हात झटकत सांगितले नाव
रंजन फ्रेश होण्यासाठी गेल्यानंतर ड्रायव्हर आणि दोन्ही अंगरक्षकही त्यांच्यासोबत गाडीतून खाली उतरले. रस्त्याच्या कडेला खूप अंधार होता, त्यामुळे चालक आणि अंगरक्षक परत गाडीत बसले. परंतु, रंजन हे परत येण्यापूर्वीच चालकाने गाडी सुरू केली आणि बोधगयाकडे निघाले. त्यांच्या मोबाईल पाहण्याच्या नादादत त्यांना वाटलं साहेब आधीच गाडीत बसले आहेत.
दरम्यान, अधिकारी रंजन जेव्हा फ्रेश होऊन परत आले तेव्हा त्यांना त्यांची गाडी सापडली नाही म्हणून ते अस्वस्थ झाले. त्यांचा मोबाईल आणि इतर सामान गाडीत असल्याने ते त्यांच्या ड्रायव्हरला फोनही करू शकले नाहीत. कसा तरी ते दीड किलोमीटर चालत पोलीस स्टेशनला पोहोचले जिथून त्यांनी त्यांच्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्डशी संपर्क साधला. त्यानंतर या दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.