Download App

महाराष्ट्र अन् झारखंड.. लोकसभेनंतर आघाड्यांची पहिली फाइट; ‘इंडिया’समोर चॅलेंज!

महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुका विरोधी इंडिया आघाडीसाठी रियल टेस्ट ठरणार आहेत. यामध्ये मोठं आव्हान आहे.

Maharashtra & Jharkhand Assembly Elections 2024 : हरियाणा आणि जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला जबरदस्त (Congress Party) हादरे बसले आहेत. हरियाणात काँग्रेसने आप आणि समाजवादी पार्टीला सोबत घेतलं नव्हतं. स्वबळावर निवडणूक लढवली. परंतु या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसने (Jammu Kashmir) नॅशनल कॉन्फरन्सबरोबर आघाडी केली होती. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स सर्वात (National Conference) मोठा पक्ष ठरला. तसेच काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला पूर्ण बहुमत मिळालं.

नॅशनल कॉन्फरन्सने अपक्षाना सोबत घेत आपली ताकद आणखी वाढवली. तर दुसरीकडे जम्मूत काँग्रेसने खराब कामगिरी केली म्हणून नाराजीही व्यक्त केली. याचा परिणाम असा झाला की काँग्रेस या नव्या सरकारमध्ये सहभागी झाला नाही. या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यावर विचार सुरू असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरच्या ताज्या अनुभवानंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीसाठी (INDIA Alliance) महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुका रियल टेस्ट (Maharashtra Elections) ठरणार आहेत. यामागे काही कारणेही आहेत. हरियाणात इंडियन नॅशनल लोकदल, जननायक जनता पार्टी यांचे आपापली आघाडी होती. पण बहुतांश मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपा यांच्यात (BJP) सरळ लढत होती. अशाच प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा चित्र एकतर्फीच राहिले. जम्मूमध्ये भाजप वरचढ ठरला तर काश्मीर खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्स सर्वात मोठा पक्ष ठरला. आता महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुका (Jharkhand Elections) रियल टेस्ट कशा ठरणार आहेत हे चार पॉइंट्स मध्ये समजून घेऊ या..

जम्मू काश्मीरात ट्वि्स्ट! अब्दुल्ला सरकारमध्ये काँग्रेस नाही; बाहेरून पाठिंब्याची शक्यता

लोकसभेनंतर आघड्यांची पहिली मोठी लढाई

लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections) पहिल्यांदा इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात लढत होईल. महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वातील युतीत एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी आहे. तर मविआमध्ये काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (Sharad Pawar) सहभागी आहेत. महाराष्ट्रात एनडीएच्या ड्रायव्हिंग सीटवर एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे तर झारखंडमध्ये इंडिया आघाडीचे नेतृत्व झारखंड मुक्ती मोर्चा करत आहे. झामुमोसोबत काँग्रेस, राजद आणि डावे पक्षही आहेत. आता या निवडणुकीत इंडिया आघाडीसमोर मोठं आव्हान उभं आहे.

राष्ट्रीय राजकारणासाठी दोन्ही राज्यांचे महत्त्व

महाराष्ट्र आणि झारखंड दोन्ही राज्ये राष्ट्रीय राजकारणासाठी महत्त्वाची आहेत. हरियाणात भाजप सत्ता (Haryana Elections 2024) राखण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर झारखंडमध्ये जर एनडीए आघाडीला विजय मिळाला तर हा इंडियासाठी बिहार राज्याच्या विधानसभा (Bihar Elections) निवडणुकीआधी मोठा धक्का ठरेल. बिहार आणि हिंदी पट्ट्यातील अन्य राज्यांतील विरोधी नेते आणि कार्यकर्त्यांवर याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता राहील. लोकसभा जागांच्या दृष्टीने महाराष्ट्र युपीनंतर दुसरे मोठे राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूकही राष्ट्रीय राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

महाराष्ट्रानंतर झारखंडमध्येही विधानसभेचं बिगुल वाजलं, दोन टप्प्यात होणार मतदान, जाणून घ्या वेळापत्रक

विरोधकांच्या नरेटीव्हचीही परीक्षा

लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या तर एनडीए आघडीच्या जागा कमी होऊन 293 वर आल्या. यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून दावा केला जात आहे की भाजपचा ग्राफ खाली चालला आहे. तसेच पीएम नरेंद्र मोदींच्या  (PM Narendra Modi) चेहऱ्याची जादू आता फिकी पडल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. हरियाणानंतर आता महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांत एनडीए आघाडी यशस्वी ठरल्यास हा नरेटीव्ह सुद्धा संपुष्टात येईल.

लोकसभा निवडणुकीत झारखंड आणि महाराष्ट्रात इंडिया आघडीने चांगली कामगिरी केली. झारखंडमधील 14 पैकी 5 मतदारसंघात भाजप विरोधक जिंकले आहेत. तर महाराष्ट्रातील 48 पैकी 29 जागा विरोधी इंडिया आघाडीने जिंकल्या. आता या दोघांना विधानसभा निवडणुकीत मोठं आव्हान पार करावं लागणार आहे.

follow us