Download App

गुंतवणूकदारांना दिलासा, सेन्सेक्स 1 लाखांवर पोहोचणार; जाणून घ्या विश्लेषकाचा अंदाज

Indian Stock Market : भारतीय शेअर बाजारात मार्च 2025 मध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. या घसरणीनंतर बाजारात गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान

  • Written By: Last Updated:

Indian Stock Market : भारतीय शेअर बाजारात मार्च 2025 मध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. या घसरणीनंतर बाजारात गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले होते मात्र आता भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) पुन्हा एकदा ‘अच्छे दिन’ येण्यास सुरुवात झाली आहे. तर आता सेन्सेक्स 1 लाखांवर पोहचणार असा अंदाज विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे. याचा मुख्य कारण म्हणजे अमरेकाचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ धोरणावरील अस्थिरतेमुळे अमरिकन शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करताना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स (Sensex) 1 लाखांवर पोहचणार असल्याचा अंदाज विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.

माहितीनुसार, सध्या जागतिक गुंतवणूकदार गुंतवणूकीसाठी एक सुरक्षित जागा शोधत आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराला जागतिक गुंतवणूकदाराकडून एक उत्तम पर्याय म्हणून पाहायला जात आहे. भारतीय शेअर बाजारात गेल्या पाच सत्रांमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) ₹17,930 कोटींची खरेदी केली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती मात्र त्यानंतर आता शेअर बाजार घसरणीतून वेगाने सावरत आहे.

तर अमरिका शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, जेफरीजचे क्रिस्टोफर वूड यांनी अलीकडेच गुंतवणूकदारांना अमेरिकन स्टॉक ‘विकण्याचा’ आणि भारतात गुंतवणूक वाढवण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे विश्लेषक प्रशांत तपासे म्हणाले की, टॅरिफ वॉरच्या बाबतीत भारतीय शेअर बाजार सुरक्षित स्थितीत आहे आणि याबाबतची माहिती विदेशी गुंतवणूदारांना देखील आहे. मला वाटते की अमेरिका मंदीकडे वाटचाल करत आहे आणि ज्या देशात मंदी येते त्या देशातून पैसा बाहेर पडतो आणि जास्त वाढीची क्षमता असलेल्या ठिकाणी गुंतवला जातो. सध्या भारत हा एकमेव देश आहे जिथे जीडीपी 6%+ आहे.

रायफल हिसकावण्याचा प्रयत्न अन्…, सय्यद हुसेन शाह पर्यटकांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी भिडला

विश्लेषक प्रशांत तपासे पुढे म्हणाले की, भारतीय बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स सध्या 80,000 च्या वर व्यवहार करत आहे. 1 लाखापर्यंत पोहचण्यासाठी आणखी 25% वाढ आवश्यक आहे आणि हे शक्य होईल असं देखील ते म्हणाले. सेन्सेक्सचा शेवटचा सर्वकालीन उच्चांक 85,978.25 होता, जो 27 सप्टेंबर 2024 रोजी पोहोचला होता. “मी असे म्हणू शकत नाही की सेन्सेक्स 1 लाख ओलांडू शकेल, परंतु आपण एक नवीन उच्चांक गाठण्याची दाट शक्यता आहे. या वर्षी सेन्सेक्स 90,000 चा टप्पा ओलांडू शकेल,” असे तापसे म्हणाले.

follow us