Jammu Kashmir Elections Results 2024 : हरियाणात अतिशय निराशाजनक (Haryana Assembly Elections) कामगिरी करणाऱ्या दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीने जम्मू काश्मिरात मात्र खातं (Jammu Kashmir Elections) उघडलं आहे. येथील निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे. डोडा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक यांनी भारतीय जनता पार्टीचे गजय सिंह राना यांचा जवळपास साडेचार मतांनी पराभव केला.
डोडा से आम आदमी पार्टी के उम्मीदवार मेहराज मलिक द्वारा बीजेपी को हराकर शानदार जीत हासिल करने के लिए बहुत बहुत बधाई। आप बहुत अच्छा चुनाव लड़े।
पांचवें राज्य में MLA बनने पर पूरी आम आदमी पार्टी को बधाई।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 8, 2024
जम्मू काश्मीरच्या 90 मतदारसंघात तीन टप्प्यांत मतदान झालं होतं. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला झालं होतं. तीन टप्प्यात एकूण 63.45 टक्के मतदान झालं. यंदा नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढल्या. तसेच मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी आणि भारतीय जनता पार्टीने स्वबळावर निवडणूक लढली. या निवडणुकीचे निकाल आता हाती येत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेस एनसी आघाडीने बहुमत पार केले आहे. तर भाजपनेही जवळपास 28 जागांवर आघाडी घेतली आहे.
डोडा मतदारसंघात विजय मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत विजयी उमेदवाराचं अभिनंदन केलं. केजरीवाल म्हणाले, डोडा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करत शानदार विजय मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तुम्ही निवडणुकीत खूप चांगल्या पद्धतीने लढलात पाचव्या राज्यात आमदार निवडून आल्याबद्दल सर्व आम आदमी पक्षाला माझ्या शुभेच्छा असे अरविंद केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हरियाणात आप साफ! केजरीवाल-सिसोदियांच्या प्रचाराचा परिणाम शून्य, सर्वत्र पिछाडी
हरियाणात अरविंद केजरीवालांची जादू चाललीच नाही. आम आदमी पार्टीने येथे भरपूर प्रयत्न केले. 88 जागांवर उमेदवार दिले. मात्र मतमोजणीत आप हरियणातून साफ होताना दिसत आहे. आम आदमी पार्टी एकाही मतदारसंघात आघाडीवर नाही. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांनी निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. मात्र हरियाणातील मतदारांवर त्याच काहीच परिणाम झाला नाही. सध्याच्या ताज्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष एकाही मतदारसंघात आघाडीवर नाही.