Download App

मोठी बातमी! काश्मीरच्या किश्तवाडमधील चकमकीत दोन जवान शहीद; दोन जखमी

किश्तवाड जिल्ह्यातील चटरू परिसरात शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतावाद्यांत जोरदार धुमश्चक्री उडाली.

Kishtwar Encounter : जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. मात्र येथील दहशतवादी हल्ल्यांच्या घटना वाढू लागल्या आहेत. किश्तवाड जिल्ह्यातील चटरू परिसरात शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतावाद्यांत जोरदार धुमश्चक्री उडाली. या चकमकीत भारतीय लष्कराच चार जवान जखमी झाले. यातील दोघेजण शहीद झाले. जखमी जवानांना रुग्णालयात घेऊन जात असताना यातील दोन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी छतरू भागातील नैदघाम येथे नाकाबंदी करून शोध मोहिम सुरू केली होती. या दरम्यान सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांत गोळीबार सुरू झाला. या चकमकीत दोन जवान जखमी झाले.

Breaking..! छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; चकमकीत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा

ऑपरेशन शाहपुरशालची माहिती व्हाइट नाइट कोरने देताना सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये म्हटले आहे की गुप्त माहिती मिळाल्यानंतर किश्तवाडमधील चटरू भागात जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीने संयुक्त अभियान सुरू करण्यात आले. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चकमकीला सुरुवात झाली. याआधी नायदगाम गावात लपून बसलेल्या अतिरेकी आणि सुरक्षा दलात गोळीबार झाल्याचे पोलीस प्रवक्त्याने सांगितले.

पीएम मोदींच्या दौऱ्याआधी चकमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दौऱ्याआधी ही चकमकीची घटना घडली. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा (Jammu Kashmir) निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची घोषणा झाली आहे. प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रचार सभा होत आहेत. 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याआधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर येणार आहेत. येथे प्रचार सभा घेणार आहेत. त्याआधी ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीर विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. नॅशनल कॉन्फरन्स 51 जागांवर निवडणूक लढेल. काँग्रेसला 32 जागा देण्यात आल्या आहेत. तर, दोन जागा मित्र पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. एक जागा माकपला तर एक जागा जेकेएनपीपी पक्षाला सोडण्यात आली आहे. पाच जागांवर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

काश्मिरच्या इलेक्शमध्ये इंजिनिअर राशिदची एन्ट्री! लोकसभेची पुनरावत्ती होणार?

जम्मू काश्मिरात तीन टप्प्यांत मतदान पार पडणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे. तर 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

follow us