Jammu Kashmir Election : गणित सुटलं; नॅशनल कॉन्फरन्सला 51, काँग्रेसला 32 जागा, तर 5 जागांवर मैत्रीपूर्ण लढत
Jammu & Kashmir Election : जम्मू-काश्मीर (Jammu & Kashmir) आणि हरयाणा राज्यांच्या निवडणूका केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीरात तीन टप्प्यांत निवडणूका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीए आघाडी आणि इंडिया आघाडी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आलीयं. ही निवडणूक तीन टप्प्यांत होणार आहे. जागावाटपबाबत नॅशनल कॉन्फरन्स फारुख अब्दुल्ला आणि काँग्रेस नेते के.सी.वेणूगोपाल यांनी दिलीयं.
जम्मू काश्मीर विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. नॅशनल कॉन्फरन्स 51 जागांवर निवडणूक लढेल. काँग्रेसला 32 जागा देण्यात आल्या आहेत. तर, दोन जागा मित्र पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. एक जागा माकपला तर एक जागा जेकेएनपीपी पक्षाला सोडण्यात आली आहे. पाच जागांवर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
साखर विक्रीच्या नावाखाली 58 लाखांना फसवलं; शिवसेना उपनेते साजन पाचुपतेंसह संचालक मंडळावर गुन्हा!
के. सी. वेणूगोपाल म्हणाले, भाजपला काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर बोलण्याचा अधिकार नसून भाजपने याआधी नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसोबत युती केलीयं, नॅशनल कॉन्फरन्स जुनीच नॅशनल कॉन्फरन्स आहे, तर पीडीपी देखीलजुनाच पीडीपी आहे. भाजपने दोन्ही पक्षांसोबत युती केलीयं, प्रत्येक राजकीय पक्षाचा कार्यक्रम असतो, जाहीरनामा असतो, आम्ही जेव्हा सरकार बनवू तेव्हा किमान समान कार्यक्रम असणार असल्याचं वेणुगोपाल यांनी सांगितलंय. तर फारुख अब्दुल्ला म्हणाले, जम्मू काश्मीरमधील लोकांमध्ये जे फुट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यांच्याविरोधात आम्ही एकत्र लढणार आहोत. जागावाटपाबाबत आम्ही आज समन्वय साधला आहे, ही विधानसभा निवडणूक नॅशनल कॉन्फरन्स एकत्र लढवण्यात येणार असल्याचं अब्दुल्ला यांनी सांगितलंय.
साखर विक्रीच्या नावाखाली 58 लाखांना फसवलं; शिवसेना उपनेते साजन पाचुपतेंसह संचालक मंडळावर गुन्हा!
जम्मू काश्मिरात तीन टप्प्यांत मतदान पार पडणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे. तर 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.