Jyoti Malhotra : हेरगिरी प्रकरणात अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) आणि गजालाने (Gajala) अखेर आपले पत्ते उघडले आहेत. होय, आम्ही पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याची कबुली दोघींनीही पोलिसांना दिली आहे. त्यामुळे आता ज्योती मल्होत्रा आणि गजाला यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात अद्याप पोलिसांकडून अधिकृत सांगण्यात आलेलं नसून वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तावरुन ही माहिती समोर आली आहे.
भारतीय लष्करानं धूळ चारल्यानंतरही असीम मुनीर यांना सर्वोच्च लष्करी पदावर बढती, बनले फील्ड मार्शल
पाकिस्तानातील अली हसन याने आपली आयएसआयच्या अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती. त्यानंतर पाकिस्तानातच आयएसआय एजंट शाकीर राणा शाहबाजचीही भेट घालून दिली होती. आयएसआयचा एजंट शाकीरचा फोन नंबर माझ्या मोबाईलमध्ये जट रंधावा या नावाने जतन केला होता. त्याच्यासोबत माझं वारंवार बोलणं होतं होतं. या संवादादरम्यान, आपण देशविरोधातील माहिती पाकिस्तानला पुरवल्याची कबुली ज्योती मल्होत्रा हिने पोलिसांनी दिली आहे.
प्लॅटिनमच्या नावाखाली दुबईहून भारतात होणाऱ्या सोनं तस्करीबाबात सरकारचा मोठा निर्णय
यासोबतच हेरगिरी प्रकरणा पोलिसांच्या ताब्यात असलेली गजाला हिचीदेखील पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. तिनेही आपल्या जबाबात अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला असून आपल्या भावाच्या मोबाईलवरुन तिने पाकिस्तानमधील आयएसआयच्या एजंटला गुप्त माहिती पाठवली असल्याची कबुली गजाला हिने दिली आहे. तसेच या हेरगिरीसाठी मला युपीआयच्या माध्यमातून पैसे मिळाले होते. तर दानिशने मला लग्नाचं खोटं अमिषही दाखवल्याचा दावा गजाला हिने केला आहे.
Nashik : पोलिसांना कुख्यात आरोपींसोबत जेवण भोवलं; पोलिस आयुक्तांनी थेट घरचा रस्ता दाखवला
दरम्यान, हेरगिरी प्रकरणी आत्तापर्यंत एकूण 8 जणांना पोलिसांनी अटक केली असून या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. या चौकश्यांमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. त्यामुळे आता या हेरगिरी प्रकरणात आणखी कोण आहे का? पाकिस्तानला कोणती माहिती या आरोपींनी पाठवली होती? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.