Arvind Kejriwal : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेच्या जोरावर महायुतीने (Mahayuti) राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन केली आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवसात राज्यातील महिलांच्या बँक खात्यात 2100 रुपये देखील जमा होणार आहे. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये देखील लाडकी बहीण सारखी योजना सुरु करण्याचा निर्णय आम आदमी पार्टीने (AAP) घेतला आहे.
याबाबत माहिती देताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सांगितले की, आजपासून दिल्लीतील महिलांना दरमहा 1000 रुपये मिळणार आहेत. दिल्ली सरकारची ही योजना आजपासून लागू झाली आहे. निवडणूक जिंकल्यानंतर सध्याची 1000 रुपये प्रति महिना 2100 रुपये करण्यात येईल. असं माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एक महिन्याचा कालावधी बाकी आहे मात्र त्यापूर्वी केजरीवाल यांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मास्टरस्ट्रोक टाकला आहे. दिल्ली सरकारने महिला सन्मान योजनेला मान्यता दिली. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा 1000 रुपये येतील. यासाठी महिलांना प्रथम नोंदणी करावी लागणार आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, निवडणुकीपूर्वी पैसे खात्यात जाणे सध्या शक्य नाही त्यामुळे निवडणुकीनंतर पैसा खात्यात जमा होणार आहे. उद्यापासून नोंदणी सुरू होणार आहे. आता 2100 नाही तर 1000 रुपये देऊ. महिला म्हणाल्या की महागाई खूप वाढली आहे आणि एक हजार रुपये पुरेसे नाहीत. निवडणुकीनंतर, आज पास झालेली 1000 रुपयांची योजना 2100 रुपयांमध्ये बदलली जाईल. असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
BJP की तमाम साज़िशें भी महिला सम्मान योजना को नहीं रोक पाई🔥💯
👉 दिल्ली की हर महिला को हर महीने मिलेंगे ₹2100 @ArvindKejriwal #KejriwalMahilaSammanYojna pic.twitter.com/OIhTiqFUgj
— AAP (@AamAadmiParty) December 12, 2024
तर दुसरीकडे त्यांनी यावेळी केंद्र सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला. यावेळी केजरीवाल म्हणाले की, मला एप्रिल-मेमध्येच त्याची अंमलबजावणी करायची होती, पण खोट्या प्रकरणात मला तुरुंगात पाठवण्यात आले, त्यामुळे 6-7 महिन्यांचा विलंब झाला. असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. तसेच या योजनेवर दिल्ली सरकारचा कोणताही खर्च होणार नाही, उलट माता-भगिनींच्या आशीर्वादान लाभणार आहे. मात्र भाजपचे लोक म्हणतात पैसा कुठून येणार.
ब्रिस्बेनमध्ये टीम इंडिया देणार ऑस्ट्रेलियाला धक्का, रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय
आम्ही वीज मोफत करण्याबाबत बोललो तेव्हा ते असेच म्हणायचे. असं केजरीवाल म्हणाले. ज्याप्रमाणे मी वीज मोफत केली आणि 1000 रुपयांची योजना लागू केली, त्याचप्रमाणे आम्ही 2100 रुपयांची योजनाही राबवू. मला विश्वास आहे की माझ्या प्रत्येक माता-भगिनींनी एकत्र आल्यास या निवडणुकीत ‘आप’ला 60-65 जागा मिळतील. कमी जागा आल्या तर हे लोक आमदार फोडतील. असेही यावेळी केजरीवाल म्हणाले.