Download App

CM होताच मोहन यादवांचा धडाकेबाज निर्णय; भोंगे अन् उघड्यावरील मांसविक्री केली बंद

  • Written By: Last Updated:

Loudspeaker Ban : मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी पदभार स्वीकारताच मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील धार्मिक स्थळांवर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवण्यास मुख्यमंत्र्यांनी बंदी (Loud loudspeakers prohibited) घातली आहे. राजधानी भोपाळमध्ये झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. याशिवाय, उघड्यावर मांसविक्री करण्यासही बंदी घालण्याचा आदेश त्यांनी जारी केला आहे.

‘ओबीसी नेत्यांना नाव ठेवणार नाही ‘हा’ एकच बोलतोयं’; जरांगेंकडून भुजबळांचा पुन्हा एकेरी उल्लेख 

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर यादव यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आपला पहिला मोठा निर्णय घेत धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले. लाऊडस्पीकर तपासण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये पथके तयार करण्यात येणार आहे, असं आदेशात सांगण्यात आलं. आदेशात पुढे म्हटले आहे की, लाऊडस्पीकरच्या अनावश्यक वापरामुळे ध्वनी प्रदूषण होते, ज्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करण्याची मानवी क्षमता कमी होते आणि रात्री उशिरापर्यंत त्याचा वापर केल्याने लोकांना त्रास होता. त्यामुळे लाऊडस्पीकर किंवा डीजेचा गैरवापर होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

‘हे चुकीचंच, मनोरंजनाला फाशी द्या…’, संसदेत सुरक्षा भंग करणाऱ्या मनोरंजनच्या वडिलांची प्रतिक्रिया

मध्य प्रदेश सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये ध्वनी मानकांचे पालन करण्यास सांगितले आहे. औद्योगिक, व्यावसायिक, निवासी आणि शांत क्षेत्रांचे वर्गीकरण करून मानकांचे पालन करावे, असे आदेशात म्हटले आहे.

याशिवाय उघड्यावर मांस विक्रीवर बंदी घालण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. मध्य प्रदेशच्या गृह विभागाने हा आदेश जारी केला आहे.

श्री रामचरितमानस’ हा ऐच्छिक विषय असावा-
मोहन यादव यांनी पदभार स्वीकारताच दिलेला हा पहिला आदेश आहे. धार्मिक किंवा सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने वाजणारे लाऊडस्पीकर काढून टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.
सीएम मोहन यादव हे आरएसएसशी संबंधित आहेत. त्यांच्या पहिल्याच आदेशामुळं मुस्मिम समाजाच्या भावना दुखावल्याची चर्चा आहे. याआधी शिवराज सरकारमध्ये मोहन यादव शिक्षणमंत्री पदावर होते. त्यांनी 2021 मध्ये महाविद्यालयांमध्ये हिंदू महाकाव्य ‘श्री रामचरितमानस’ हा पर्यायी विषय बनवण्याची घोषणा केली होती. मोहन यादव हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक मानले जातात.

कोण आहेत मोहन यादव?

मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव हे 2013 मध्ये प्रथमच उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा आमदार होण्याचा मान मिळविला. 2020 मध्ये त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा याच जागेवरून निवडणूक जिंकली. अशा परिस्थितीत त्यांना मुख्यमंत्री करून पक्षाने राजकीय पंडितांनाही आश्चर्याचा धक्का दिला. राजधानी भोपाळ येथील लाल परेड मैदानावर राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी 58 वर्षीय यादव यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

Tags

follow us

वेब स्टोरीज