Download App

LPG Price : 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर मिळणार? राजस्थानमध्ये घोषणा अन् संसदेत नकार

LPG Price : राजस्थानमध्ये (Rajasthan)भाजपने (BJP)आपल्या जाहीरनाम्यात (Manifesto) 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर (LPG cylinder)देण्याचं आश्वासन दिलं. पण राज्यसभेमध्ये (Rajya Sabha)हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारने(Central Govt) राजस्थानमध्ये 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर देण्याचा कोणताही विचार नसल्याचं सांगितलं आहे.

शाहरुखची पत्नी गौरीकडून 30 कोटींचा गंडा? ईडीने धाडली नोटीस

राजस्थानमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका (Rajasthan Assembly Elections)पार पडल्या. त्यात भाजपकडून राजस्थानमध्ये 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली. त्यानंतर आता राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आली आहे.

शेअर बाजारात रेकॉर्डब्रेक उसळी! एका दिवसात गुंतवणूकदार मालामाल

त्यावर राज्यसभेत खासदार जावेद अली खान (Javed Ali Khan)यांनी सोमवारी प्रश्न विचारला की, केंद्र सरकारने राजस्थानमध्ये 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे की, उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

त्यावर पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli)यांनी सांगितले की, राजस्थानमध्ये 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्याचा कोणताही विचार नाही. भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केली नसल्याचे राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये विचारलेल्या प्रश्नावर सरकारकडून असं उत्तर देण्यात आलं.

नुकत्याच राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणासह मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये भाजपकडून अनेक घोषणा केल्या. त्यात राजस्थानसह मध्यप्रदेशमध्येही 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा सत्ताधारी भजापकडून करण्यात आली. त्यानंतर त्या राज्यांमध्ये सत्ता आल्यावर मात्र सरकारकडून असा कोणताही विचार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Tags

follow us