शेअर बाजारात रेकॉर्डब्रेक उसळी! एका दिवसात गुंतवणूकदार मालामाल

शेअर बाजारात रेकॉर्डब्रेक उसळी! एका दिवसात गुंतवणूकदार मालामाल

Share Market : शेअर बाजारमध्ये (Share Market)आज मंगळवारी चांगलीच तेजी पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजारानं पुन्हा एकदा नवीन शिखर गाठले. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये (Intraday trading)सेन्सेक्सनं (Sensex)71,623 अंकांच्या नवीन सर्वकालिक उच्चांक गाठला आहे. त्याचवेळी, निफ्टीनं (Nifty)प्रथमच 21,500 चा आकडा पार केला आहे. याच्या जोरावर गुंतवणुकदारांनी (investors)आज एका दिवसात सुमारे 46,000 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

20 Years: अर्शद वारसीच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ला पूर्ण झाली 20 वर्ष! अभिनेता पोस्ट लिहीत म्हणाला…

आज शेअर बाजार तेजीसह बंद झाल्याचा पाहायला मिळाला. शेवटी, बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 122.09 अंकांनी किंवा 0.17 टक्क्यांनी वाढून 71,437.19 अंकांवर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 27.30 अंकांनी किंवा 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 21,445.95 वर बंद झाला.

Ahmednagar : वाळू धोरणावरुन तनपुरेंनी महसूलमंत्र्याना घेरलं, वाळू वाहतूकदारांकडून लूट…

गुंतवणुकदारांची चंगळ :
BSE वर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 19 डिसेंबरला 359.23 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले. सोमवारी म्हणजेच 18 डिसेंबरला ते भांडवल 358.77 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांची मार्केट कॅप आज सुमारे 46 हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. अर्थातच गुंतवणुकदारांच्या संपत्तीत सुमारे 46 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

त्याचबरोबर सेन्सेक्समधील उर्वरित 15 शेअर्समध्ये आज घसरण होऊन बंद झाले. यामध्ये विप्रोचे शेअर्स 1.63 टक्क्यांपर्यंत घसरले. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), एचसीएल टेक, टाटा स्टील आणि मारुती सुझुकीचे शेअर्स 0.76 ते 1.36 टक्क्यांपर्यंत घसरले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube