Mahakumbh Mela New Traffic Rules : गेल्या महिन्यापासून सुरू असणाऱ्या महाकुंभ मेळ्यात (Mahakumbh Mela) माघी पौर्णिमेनिमित्त (Maghi Purnima) मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाकडून वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 12 फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेला गर्दी कमी करण्यासाठी 11 फेब्रुवारी पहाटे 4 वाजल्यापासून परिसरात नो व्हीकल झोन (No Vehicle Zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. याचबरोबर प्रशासनाकडून वेगवेळ्या मार्गांसाठी वेगवेगळे पार्किंग झोन तयार करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
या पार्किंग झोनमध्ये शहराबाहेरुन येणाऱ्या भाविकांना गाडी पार्क करावी लागणार आहे. 12 फेब्रूवारी रोजी हीच वाहतुक व्यवस्था असणार आहे. सोमवारी रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला आणि भाविकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर त्यांनी अधिकाऱ्यांना 5 लाखांहून अधिक वाहनांच्या उपलब्ध पार्किंग क्षमतेचा पूर्णपणे वापर करण्याचे निर्देश देखील दिले आहे.
रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागू देऊ नका आणि वाहतूक कोंडी कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखली पाहिजे असे आदेश देखील त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले आहे. तर दुसरीकडे जर तुम्ही देखील महाकुंभासाठी प्रयागराजला जात असाल तर नव्या ट्रॅफिक नियमांमुळे तुम्हाला 8 ते 10 किमी चालत प्रवास करावा लागू शकतो. बॉर्डरपासूनच तुम्हाला शटल बस किवा ऑटोने प्रयागराजमध्ये प्रवेश करावा लागेल आणि तिथून महाकुंभ येथे पोहोचायला 8 ते 10 किमी पायी चालावं लागेल असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.
पोलिसांनी सूचना जारी केल्या
संगम घाटावर पोहोचण्यासाठी, फक्त वेगवेगळ्या लेनमधून जा.
गंगा स्नानाला जाताना, तुमच्या लेनमध्ये राहा.
येणाऱ्या भाविकांनी स्नान आणि दर्शन घेतल्यानंतर थेट पार्किंगमध्ये जावे.
मंदिरांना भेट देताना, तुमच्या गंतव्यस्थानावर थांबा आणि तेथून तुमच्या गंतव्यस्थानाकडे प्रयाण करा.
गरज पडल्यास पोलिसांची मदत घ्या; पोलिस तुमच्या मदतीसाठी आहेत.
वाहतूक पोलिसही तुम्हाला मदत करण्यास तयार आहेत.
आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येच्या बाबतीत, जवळच्या सेक्टरमधील रुग्णालयात स्वतःची तपासणी करा.
बॅरिकेड्स आणि पोंटून पुलांवर संयम ठेवा; घाई करणे आणि धक्काबुक्की करणे टाळा.
फक्त कागद, ज्यूट किंवा पर्यावरणपूरक भांडी आणि मग वापरा.
सर्व घाट संगम घाट आहेत, तुम्ही ज्या घाटावर पोहोचाल तिथे स्नान करा.
गर्दीचा विक्रम मोडला, आतापर्यंत 45 कोटी लोकांनी स्नान केले
13 जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभात 45 कोटींहून अधिक लोकांनी संगमात स्नान केले आहे. संपूर्ण महाकुंभ मेळ्यात इतक्या मोठ्या संख्येने लोक स्नान करतील असा अंदाज होता.
स्टार प्लस करणार गेमिंग जगात प्रवेश?, ‘जादू तेरी नजर – डायन का मौसम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
महाकुंभला अजून 15 दिवस शिल्लक आहेत. याआधीही स्नान करणाऱ्यांची संख्या 45 कोटींच्या पुढे गेली आहे. उद्या माघ पौर्णिमेला आणि त्यानंतर शिवरात्रीला गर्दीचा एक नवीन विक्रम निर्माण होऊ शकतो. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.