Mallikarjun Kharge : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी जोददार तयारी केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. भाजपकडून (BJP) होणाऱ्या टीकेला कॉंग्रेसकडून जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातं. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मध्यप्रदेशातील धार येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी खर्गेंनी आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. ज्या घरात मोदींचा फोटो आहे, ते घर गरीब झालेच म्हणून समजा, असं खर्गे म्हणाले.
लोकसभा रणशिंग! मविआचे जिल्ह्यातील दक्षिण-उत्तर झाले फायनल?
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या मध्य प्रदेशातील धारमध्ये आहे. खर्गे आणि राहुल गांधी यांनी धार येथील जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी खर्गेंनी आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ते म्हणाले, तुम्ही टीव्ही चालू करताच तुम्हाला त्यावर मोदींचा फोटो दिसतो. ज्या घरात मोदींचा फोटो टीव्हीवर दिसतो ते घर गरिबीत जाते. पंतप्रधान मोदींना विकास नको, गरिबांचे कल्याण नको आहे. त्यांना आपल्या गोरगरीब मुलांचे शिक्षण नको आहे. कारण गरीबांची मुलं शिक्षण घेऊन पुढं आली तर आपल्याला अडचणींना सामोरे जावं लागू शकतं, असं मोदींना वाटतं. त्यामुळं मोदी गरिबांच्या विरोधात काठी उगारतात. आणि जेव्हा काँग्रेस पक्ष पुढं सरकतो तेव्हा ते त्याला चिरडण्याचे काम करतात, असे खर्गे म्हणाले.
Sonali Bendre : सोनाली बेंद्रेचा स्टायलिश अंदाज, ग्लॅमरस लुकने वेधले चाहत्यांचे लक्ष!
४५ वर्षांत सर्वाधिक बेरोजगारी
ते पुढे म्हणाले, आज देशातील ४५ वर्षांत सर्वाधिक बेरोजगारी आहे. देशातील महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. हे सर्व मोदींच्या काळात घडले आहे. देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी संपू नये, असे पंतप्रधान मोदींचे मत आहे. श्रीमंतांनी अधिक श्रीमंत व्हावे आणि गरीबांनी अधिक गरीब व्हावे, अशी मोदींची इच्छा आहे. मी दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देईन, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकेन, असे मोदी म्हणाले होते. मी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करीन, शेतकऱ्यांना एमएसपी देईन, असं म्हणत ते सत्तेत आले. पण, त्यांनी शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी काहीही केलं नाही. त्यांनी फक्त अदांनींसाठी काम केल्याचं टीका खर्गेंनी केली.
खर्गेंनी भाजपवर शिवराज सिंह चौहान यांना बाजूला सारल्याचा आरोप केला. ते म्हणाले, भाजप नेते काँग्रेसबद्दल चुकीचे बोलतात. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह चौहान यांनी खर्गे आणि आणि राहुल गांधी काँग्रेसला नष्ट करण्यासाठी एकत्र काम करत असल्याचं म्हटलं होतं. मग आता भाजपने शिवराजसिंह चौहान यांना सत्तेवरून का हटवले? असा प्रश्न उपस्थित आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
तर राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले, काही वेळापूर्वी मी एका व्हिडिओमध्ये पाहिले होते की, भाजपचा एक नेता एका आदिवासी तरुणावर लघवी करत आहे. हा कसला विचार आहे? ही भाजपची विचारधारा आहे. हे फक्त आदिवासींच्या बाबतीत घडत नाही. दलित, आदिवासी आणि गरिबांच्या बाबतीत हे घडत आहे. मध्य प्रदेशात आदिवासी लोकसंख्या २४ टक्के आहे आणि संपूर्ण देशात ८ टक्के आहे, परंतु देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांची व्यवस्थापन यादी पाहिली तर आदिवासी समाजातील एकही मालक सापडणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.