Download App

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर; प्रियंका गांधी, शशी थरुर यांच्यासह अशोक चव्हाणांना स्थान

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अशोक चव्हाण, मनमोहन सिंग, शशी थरुर यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये भाजपसमोर काँग्रेसची मोठी फौजच उभी ठाकणार असल्याचं चित्र दिसून येत आहे.

विशेष म्हणजे या कार्यकारिणीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात निवडणूक लढलेले शशी थरुर यांनाही स्थान दिलं आहे. त्यासोबतच मध्य प्रदेशातील कमलेश्वर पटेल आणि छत्तीसगडमधील ताम्रध्वज साहु यांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.

‘घुमर’ ला मिळणार आणखी स्क्रीन्स; ‘गदर 2’, ‘ओएमजी 2’ च्या स्पर्धेत होणार मदत

खरगे यांनी रविवारी जाहीर केलेल्या समितीमध्ये मध्य प्रदेशातील कमलेश्वर पटेल आणि छत्तीसगडमधील ताम्रध्वज साहू यांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये एकूण 84 नावे आहेत. मागील वर्षीच नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पूर्वीची 23 सदस्यीय समिती बरखास्त करुन 47 सदस्यांची सुकाणू समितीची नियुक्ती केली होती.

राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या छापेमारीत ईडीच्या हाती मोठं घबाड; 24 कोटीचे दागिने, 1 कोटींची रोकड जप्त

दरम्यान, CWC ही काँग्रेस पक्षातल्या सर्वोच्च कार्यकारी संस्था असून या संस्थेची स्थापना 1920 साली काँग्रेसच्या नागपूरच्या अधिवेशनात झाली होती. CWC संस्थेला पक्षाच्या घटनेच्या नियमांचं स्पष्टीकरणासह अंमलबजावणी करण्याचा अंतिम अधिकार आहे.

Tags

follow us