Download App

एनडीए 200 पेक्षा अधिक जागा जिंकणार; मोदींचं नाव घेत नितीश कुमारांनी विश्वास व्यक्त केला

Nitish Kumar News : आगामी निवडणुकीत एनडीए 200 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वास बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बिहारमध्ये आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच नितीश कुमार सभागृहात बोलत होते. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी एनडीएला किती जागांवर यश मिळणार आहे? याबाबत थेटपणे भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होणार असल्याचंही त्यांनी जाहीरपणे सांगून टाकलं आहे.

“मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार… 50 वर्षांची सवय अन् अशोक चव्हाणांचं पोटातलं ओठावर

इंडिया आघाडीसाठी अग्रस्थानी असलेले नितीश कुमार यांनी अचानक पलटी मारली आहे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेत त्यांनी बिहारमध्ये भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन केलं आहे. एवढंच नाहीतर विधानसभेत त्यांनी बहुमतही सिद्ध केलं आहे. यावेळी नितीश कुमारांच्या पदरात 130 मते मिळाली आहेत.

फारूख अब्दुल्लांच्या अडचणीत वाढ, २० वर्ष जुन्या प्रकरणात ईडीने पाठवले समन्स

जातिनिहाय जनगणनेवरुन आरजेडीला घेरलं..

जातिनिहाय जनगणनेवरुन नितीश कुमार यांनी आरजेडी पक्षाला चांगलंच घेरलं आहे. जातिनिहाय जनगणनेबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, राष्ट्रीय जनता दलाची कोणतीही भूमिका नसताना ते आज जातिनिहाय जनगणनेचे श्रेय घेत आहेत. माजी राष्ट्रपती ग्यानी झैल सिंह यांनी त्यावर काम केलं असल्याची माहिती कुमार यांनी यावेळी दिली आहे.

‘काँग्रेसची अवस्था पाहून मनाला वेदना’; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजित तांबेंची पोस्ट

तसेच आम्ही सातत्याने विकासासाठी काम करत आहोत. पोलिसांचा ताफा तसा कमी होता, आता तो पूर्ववत होत आहे. जनतेची सेवा करतो. शिक्षण, आरोग्य, कृषी अशा प्रत्येक क्षेत्रात काम केले. पूल बांधण्यात आले. पाच तासांत कुठूनही पाटणा गाठण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. कोणाच्या घरी शौचालय नव्हते. लोकांना त्यांच्या घरात शौचालये बांधण्यासाठी प्रवृत्त केले. महिलांसाठी काम केले आहे. पंचायतींमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आलं असल्याचंही ते म्हणाले आहेत.

बिहारच्या विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बहुमत सिद्ध केलं आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजे 28 जानेवारीला नितीश कुमार यांनी एनडीएसोबत युती करत नवीन सरकार स्थापन केलं आहे. नितीश कुमारांच्या या कृतीमुळे बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. दरम्यान, बिहार विधानसभेत नितीश कुमारांचं बहुमत सिद्ध झालं असून कुमार यांच्या पदरात 130 मते पडली आहेत. तर विधानसभेच्या अध्यक्षपदी नंदकिशोर यादव यांची वर्णी लागली आहे. यावेळी तेजस्वी यादव यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केल्याचं पाहायला मिळालं.

follow us

वेब स्टोरीज