NIA Investigation of Pahalgam Terror Attack : डोंगराळ दऱ्यांच्या सौंदर्यात लपलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा भयानक कट (Pahalgam Terror Attack) आता हळूहळू उघड होत आहे. देशातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बारसन व्हॅलीमध्ये 22 एप्रिल रोजी 26 निष्पाप लोकांना ठार मारणाऱ्या दहशतवाद्यांमागील (NIA Investigation) गूढतेचे थर उलगडू लागले आहेत. तपासात असं दिसून आलंय की, पाकिस्तानी दहशतवादी (Terrorist) 15 एप्रिल रोजी येथे आले. त्यांनी सात दिवस रेकी केली.
अल्ट्रा स्टेट कम्युनिकेशनचा वापर
आतापर्यंतच्या तपासात समोर आलेले तथ्य हे अत्यंत नियोजित आणि उच्च तंत्रज्ञानाने बनवलेल्या दहशतवादी हल्ल्याकडे निर्देश करतात. तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक आज स्वतः बार्सन व्हॅलीला पोहोचले. एनआयएच्या तांत्रिक तपासात हे स्पष्ट झालंय की, तिथले तिघे दहशतवादी अल्ट्रा स्टेट कम्युनिकेशन नावाच्या विशेष कम्युनिकेशन सिस्टमचा वापर करत होते, जी अत्याधुनिक एन्क्रिप्टेड नेटवर्कवर आधारित आहे. ही प्रणाली अतिशय मर्यादित सिग्नलवर काम करते . लोकेशन ट्रेसिंगची दिशाभूल देखील करते. पहलगाम परिसरात दोन संशयास्पद सिग्नलही एजन्सींनी शोधले आहेत. याद्वारे दहशतवादी एकमेकांशी संवाद साधत होते, असं मानलं जातंय.
महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारानी पुण्यात केलं ध्वजारोहण, PHOTO पाहा
तीन ठिकाणांची रेकी
दहशतवाद्यांनी अशा तीन ठिकाणांची रेकी केली, जिथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. एका दहशतवाद्याने पहलगामच्या मनोरंजन उद्यानाची रेकी केली होती. येथे कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे ते पुढे ढकलण्यात आले. तपासासाठी एजन्सींनी 3D मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून घटनास्थळाचा व्हर्च्युअल नकाशा देखील तयार केला.
हा परिसर डोंगराळ आहे आणि अनेक ठिकाणी सीसीटीव्ही नेटवर्क नाही. त्यामुळे सुरुवातीला तपास करणे कठीण झाले. परंतु घटनेतील काही प्रत्यक्षदर्शी आणि वाचलेल्यांच्या विधानांमुळे एजन्सींना खूप मदत झाली आहे. एनआयएच्या प्राथमिक तपासात असे दिसून आलंय की, या संपूर्ण कारवाईत स्थानिक मदतनीसांचाही सहभाग असू शकतो, आता कोणाचा शोध घेण्यात आला आहे. लवकरच काही अटक होण्याची शक्यता आहे. बार्सन व्हॅली आता पूर्णपणे सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा दलांच्या नियंत्रणाखाली आहे. येथे सध्या सामान्य नागरिकांची ये-जा बंद आहे आणि एनआयएचे डीजी स्वतः तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांने एक्झिट गेटमधून पार्कमध्ये प्रवेश केला अन् अंदाधुंद गोळीबार सुरू केला. खरंतर हा दहशतवाद्यांच्या नियोजनाचा एक भाग होता. जेव्हा बाहेर पडण्याच्या गेटवर गोळीबार सुरू झाला, तेव्हा सर्वजण पळून जाण्यासाठी प्रवेशद्वाराकडे गेले. तिथे दोन दहशतवादी होते. त्यांनी सर्वांना एकत्र केले. दहशतवाद्यांनी सुरूवातीला गर्दीतील पुरुष अन् महिलांना वेगळं होण्यास सांगितलं. दहशतवादी त्यांना कलमा म्हणायला लावतात आणि एक एक करून मारलं. एनआयएने घटनास्थळी सापडलेले काडतूसाचे कवच फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. परंतु आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आलंय की, फक्त तीन दहशतवाद्यांनी हा नरसंहार केला होता.