Ayodhya Ram Mandir : दिल्ली एम्सने 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) दिनी दुपारी 2.30 वाजेपर्यंत ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आता ओपीडी (Delhi news) सामान्य दिवसांप्रमाणे सोमवारीही सुरू राहणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की सर्व लेडी हार्डिंग, सफदरजंग आणि राम मनोहर लोहिया रुग्णालये खुली राहणार आहे. सर्व स्तारातून टीका झाल्यानंतर एम्सने आपला निर्णय मागे घेतला आहे.
दरम्यान राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला दुपारी 2.30 वाजेपर्यत केंद्र सरकार संचालित एम्स, सफदरजंग आणि राम मनोहर लोहियास दिल्लीतील चार रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्राच्या या निर्णयावर विरोधकांनी टीका केली होती.
एम्सने काय म्हटले होते?
एम्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, केंद्र सरकारने 22 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, या काळात फक्त आपत्कालीन सेवा सुरू राहतील आणि संध्याकाळी ओपीडी सुरू राहिलं, असे एम्सने स्पष्ट केले होते. त्याच वेळी सफदरजंग हॉस्पिटलने एक निवेदन जारी केले होते की 22 जानेवारी रोजी ओपीडी सेवेसाठी सकाळी 8 ते 10 या वेळेत नोंदणी केली जाईल. प्रयोगशाळा सेवा/रेडिओलॉजिकल सेवा सकाळी 11:30 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. त्याचबरोबर फार्मसी सेवा दुपारपर्यंत सुरू राहतील.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दुपारी 2.30 वाजेपर्यंत ओपीडी, लॅब सेवा आणि नियमित सेवा बंद राहतील, असे राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले होते. याशिवाय लेडी हार्डिंग हॉस्पिटलमध्ये ओपीडी सेवेसाठी सोमवारी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे. मात्र, या सर्व रुग्णालयांनी आपत्कालीन सेवा उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Ram Mandir : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा नसणार, कुठं करणार उत्सव साजरा?
22 जानेवारीला ओपीडी सुरू राहणार
22 जानेवारी रोजी या रुग्णालयांमध्ये ओपीडी बंद राहणार नसल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. रुग्णालये दररोज नियोजित वेळेनुसार चालतील.