Download App

PM मोदींनी केलं पंबन ब्रिजचं उद्घाटन, देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट-अप समुद्री रेल्वे पूल… वैशिष्ट्ये काय?

PM Modi Inaugurated Pamban Bridge : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी भारत आणि रामेश्वरम बेटाला जोडणारा (India And Rameswaram Island) देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सागरी पूल राष्ट्राला समर्पित केला आहे. या पुलाच्या मदतीने रेल्वे कनेक्टिव्हिटी (Pamban Bridge) सुधारेल. हा पूल समुद्रातून जाणाऱ्या 2,070७० मीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकवर बांधण्यात आला आहे. या उभ्या पुलाची लांबी 72.5 मीटर आहे, जी 17 मीटरपर्यंत वाढवता येते. यामुळे मोठी जहाजे सहज जाऊ शकतात.

PM मोदींनी उद्घाटन केलेल्या पंबन ब्रिजचं वैशिष्ट्य काय?

हा पूल मंडपमपासून रामेश्वरमपर्यंत आहे. आशिया खंडातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे. हा पूल बांधण्यासाठी एकूण 535 कोटी रुपयांचा खर्च आलाय.
पूल पूर्णत: स्वनियंत्रित आहे. पूल समुद्रात असून (PM Modi News) एकूण लांबी 2.08 किलोमीटर आहे. पुल तयार करण्यासाठी अँटी कोरोजन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. गंजापासून संरक्षण करण्यासाठी पुलावर पॉलिसिलॉक्सेन लेप लावण्यात आला आहे.

जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दुःखाचा डोंगर , आई किम फर्नांडिसने घेतला जगाचा निरोप

पुलाच्या एका लेनमध्ये 2 ट्रक एकावेळी सहजपणे जाणार असल्याची माहिती मिळतेय. हा पूल जुन्या पुलापेक्षा ३ मीटर उंच आहे. पूल टिकाऊ बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आलाय.

या पुलाचे सांस्कृतिक महत्त्वही आहे. रामायणानुसार, भगवान रामाच्या सैन्याने रामेश्वरमजवळील धनुषकोडी येथून रामसेतूचे बांधकाम सुरू केले. नवीन पंबन रेल्वे पूल रामेश्वरम बेटाला भारताच्या मुख्य भूमीशी जोडतो. जागतिक स्तरावर भारतीय अभियांत्रिकीचा एक मोठा पराक्रम आहे.

वर्धापनदिन तारखेनुसार, तिथीनुसार की सोयीप्रमाणे? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, पाल्क सामुद्रधुनीतील खवळलेले पाणी, जोरदार वारे आणि अप्रत्याशित हवामानामुळे बांधकाम प्रक्रियेत अडचणी येत होत्या. चक्रीवादळे आणि भूकंपाच्या घटनांना बळी पडणारा हा परिसर संवेदनशील असल्याने काळजीपूर्वक नियोजन आणि मजबूत डिझाइन आवश्यक होते. या अडचणी असूनही नवीन पंबन पूल पूर्ण झाला.

सुरक्षित रेल्वे वाहतुकीसाठी जोरदार वारे एक आव्हान आहेत. जोरदार वाऱ्यांच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी, रेल्वेने वाऱ्याच्या वेगाचे निरीक्षण करणारी प्रणाली विकसित केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, जर वाऱ्याचा वेग ताशी 58 किमी पेक्षा जास्त असेल तर लाल सिग्नल लावला जाईल आणि रेल्वे वाहतूक थांबेल. ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान या भागात जोरदार वारे वाहतात. या पुलाची नवीन लिफ्ट बांधून पूर्ण झाल्यामुळे रामेश्वरम तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्या भाविकांसह स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

follow us