Prashant Kishor On India Alliance:ऐन लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर इंडिया ( India Alliance) आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. मी एकटी भाजपला पराभूत करू शकते, असं म्हणत ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) भाजप विरोधात एकला चलो रे ही भूमिका घेतली. दरम्यान, यावर आता निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी भाष्य केलं.
लोकसभेच्या दोन्ही जागांवर ठाकरे गटाचा दावा… संजय राऊतांची तोफ नगरमध्ये धडणार
निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. मात्र, अद्याप इंडिया आघाडीमध्ये जागावाटप झाला नाही. जागावाटपावरू कॉग्रेस आणि स्थानिक पक्ष यांच्यात मेळ झाला नाही. त्यामुळं इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख स्वबळावर लढण्याचे निर्णय घेत आहे. आज ममता बॅनर्जी इंडियातून बाहेर पडल्या आहेत. तर आपही स्वबळावर निवडणुका लढवेल, असं सीएम भगवंत मान यांनी सांगितलं. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले की, मी गेल्या 6-7 महिन्यांपासून हे सांगत आहे की, तुम्ही ज्याला इंडिया म्हणता त्यात बसलेले सर्व मुख्यमंत्री, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, स्टॅलिन, उद्धव ठाकरे, या सर्वांना मुख्यमंत्री बनवण्याची मोहीम मी सुरू केली होती. त्यांच्या विजयात माझा मोठा वाटा आहे, मी त्या सर्व लोकांना चांगले ओळखतो. त्यामुळे मी म्हणत आलोय की, या इंडिया आघाडीचे पुढं काहीही होणार नाही. हे सर्वजण आपापले राज्य वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
संयुक्त किसान मोर्चा पुन्हा सरकारला घेरणार, ‘या’ मागण्यांसाठी १६ फेब्रुवारीला दिली भारत बंदची हाक
प्रशांत किशोर पुढं म्हणाले की, इंडिया अलायन्समधील पक्षांमध्ये ऐक्य नाही, एकमेकांना मदत करण्याची इच्छाशक्ती नाही. या आघाडीतून काहीही साध्य होणार नाही. तुम्ही बंगालबद्दल बोलता, बिहारमध्ये आघाडी झाला का, हे आधी सांगा. ज्या राज्यात इंडिया आघाडीची सुरुवात झाली त्या राज्यात नितीश कुमार आघाडीबाबत स्पष्टपणे बोलू शकत नाही.
प्रशांत किशोर यांना एनडीएबद्दल विचारले असता ते म्हणाले की, एनडीएमध्ये सर्व काही एका व्यक्तीच्या हाती आहे. ते व्यक्ती म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ते जे काही सांगतात, तेच होतं. मात्र, इंडिया आघाडीचं नेमकं उलट आहे. ज्या इंडिया आघाडीची कल्पना केला जात आहे, त्याची पहिली बैठक बिहारच्या पाटणा येथे झाली. त्यानंतर सर्वप्रथम बिहारमधील जागावाटप जाहीर व्हायला हवे होते, मात्र ते अद्याप झालं नाही, असेही पीके यावेळी म्हणाले.