प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये तिसऱ्या रांगेत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे (Republic Day) बसल्यावरून राजकीय शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भाजपने आज दिल्लीत झालेल्या प्रजासत्तादिनाच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचं उल्लंघन आणि लोकशाही शिष्टाचाराचं उल्लंघन केलं असा आरोप होत आहे. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हे वर्तन प्रोटोकॉलपेक्षा सरकारची मानसिकता प्रतिबिंबित करतं. त्यांनी लिहिले की, “देशातील विरोधी पक्षनेत्याशी अशी वागणूक शिष्टाचार, परंपरा किंवा प्रोटोकॉलच्या कोणत्याही मानकांना पूर्ण करतं का? हे केवळ मानसिकतेचं लक्षण आहे. लोकशाहीमध्ये मतभेद असतात.परंतु, राहुल गांधी यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याला आणि विरोधी पक्षेत्याला अशी वागणूक हे अस्वीकार्य आहे असंही ते म्हणाले.
मोठी बातमी! मुंबई महानगरपालिकेत ठाकरे भाजपसोबत जाणार?, राजकीय हालचालींना वेग
या निर्णयामुळे संवैधानिक पदांची प्रतिष्ठा कमी झाली आहे. काँग्रेस खासदार माणिकम टागोर म्हणाले, हा मुद्दा फक्त बसण्यापुरता नाही. याची राजकीय मानसिकता यामधून प्रतिबिंबीत होत आहे. ते म्हणाले की २०१४ पर्यंत सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि लालकृष्ण अडवाणी यांसारखे विरोधी नेते नेहमीच सन्मानाने समोरच्या रांगेत असायचे.
सरकारचे हे अतिशय नीच राजकारण आहे. प्रजासत्ताक दिनी विरोधी नेत्यांचा अपमान करणे अस्वीकार्य आहे. प्रजासत्ताक दिन हा असा दिवस आहे जेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन त्या वर्षी भारताच्या कामगिरीचा आनंद साजरा केला पाहिजे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद अल्वी म्हणाले की, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे दोघेही महत्त्वाचे संवैधानिक पद भूषवतात आणि त्यांना पुढच्या रांगेत बसण्याचा अधिकार आहे.
