Download App

हिमाचलमध्ये काँग्रेसचे आमदार फुटले; भाजपच्या हर्ष महाजन यांना राज्यसभेची ‘लॉटरी’, सिंघवी पराभूत

  • Written By: Last Updated:

Rajya Sabha Elections 2024: राज्यसभा निवडणुकीतही (Rajya Sabha Elections) भाजपने काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता असूनही येथे भाजपचे उमेदवार हर्ष महाजन (Harsh Mahajan) हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व वकील अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव केला आहे. काँग्रेसच्या (>Congress) आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. त्यानंतर महाजन आणि सिंघवी यांना बरोबरीचे प्रत्येकी 34 मते मिळाली. त्यामुळे लॉटरी पद्धतीने चिठ्ठी काढण्यात आली. महाजन यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना एकप्रकारे राज्यसभेची लॉटरीच लागली आहे.

Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षण लागू; शासन निर्णय जारी

आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने अभिषेक मनू सिंघवी हे संतापले होते. त्यांनी आमदारांवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यामुळे विजयी झालो असल्याची प्रतिक्रिया हर्ष महाजन यांनी दिली आहे. हरियाणात काँग्रेसची सत्ता असून, 43 आमदार आहेत. तर भाजपचे 25 आमदार आहेत. काँग्रेसचे उमेदवार सिंघवी यांना विजयासाठी 35 आमदारांची गरज होती. आज झालेल्या मतदानामध्ये काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना समसमान 34 मते मिळाली. पण लॉटरीमध्येही नशिब हर्ष महाजन यांचे उजळले. त्यानंतर विधानसभा सचिव यशपाल यांनी हर्ष महाजन यांना विजयी घोषित केले.

शिवाजीराव आढळराव पाटील CM शिंदेंची साथ सोडणार; तब्बल 20 वर्षांनी ‘राष्ट्रवादीत’ करणार घरवापसी


मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

हिमाचल प्रदेशचे विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राज्यसभेत आमदार फुटल्याने सुक्खू सरकार अडचणीत सापडले आहे. मुख्यमंत्री सुक्खू यांनी पदाचा राजीनामा द्यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. हिमाचल प्रदेशात गेल्या वर्षी निवडणूक झाली होती. तेथे काँग्रेसचे सरकार आले. परंतु वर्षभरात राज्यसभेची निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी वेगळे रंग दाखविले आहेत. त्यामुळे येथील सरकार धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

follow us