Rajya Sabha Election : दिल्लीत ‘आप’चाच दबदबा! 3 उमेदवारांची राज्यसभेत बिनविरोध एन्ट्री
Rajya Sabha Election Result : राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाचाच दबदबा असल्याचे पुन्हा एकदा (Rajya Sabha Election Result) सिद्ध झाले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षान दिलेले तिन्ही उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. या तीन उमेदवारांविरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे खासदार संजय सिंह (Sanjay Singh), एनडी गुप्ता आणि सुशीलकुमार गुप्ता यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 जानेवारी रोजी समाप्त होत आहे. आपने खासदार संजय सिंह आणि एनडी गुप्ता यांना दुसऱ्यांदा संधी दिली होती. तसेच दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना सुशील गुप्ता यांच्या जागेवर उमेदवारी देण्यात आली होती.
सुशील कुमार गुप्ता यांना सध्या हरियाणा राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्षाने गुप्ता यांना राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की तीनही उमेदवार बिनविरोध निवडले जाणारच होती. यात काहीच शंका नव्हती. कारण, अन्य पक्षांकडून कुणीही उमेदवारी दाखल केलेली नव्हती. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 9 जानेवारी अंतिम मुदत होती. उमेदवारी अर्जांची छानणी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 जानेवारी रोजी करण्यात आली. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी 12 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. आज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पषट झाले. यानंतर आम आदमी पार्टीच्या तिनही उमेदवारांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग बिनविरोध झाला आहे.