आरबीआयचे ( Reserve Bank of India>a ) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नवीन पतधोरण जाहीर केले आहे. या पतधोरणात सलग सहाव्यांदा रेपो दरात (Repo Rate) कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच हा दर साडेसहा टक्क्यांवर राहणार आहे. त्यामुळे कर्जाच्या हप्त्यांमध्ये अर्थात ईएमआयमध्ये (EMI) कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, रेपो रेट म्हणजे नेमके काय असते? त्याचा कर्जाच्या व्याजावर कसा परिमाण होतो? हे जाणून घेऊया..
राहुल गांधींकडून ओबीसी समाजाचा अपमान, ते ओबीसी विरोधात षडयंत्र…; आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
रेपो रेट म्हणजे नेमके काय?
रेपो रेट हा एक असा दर असतो, ज्यावर बँकांना आरबीआयकडून अल्पकालीन कर्ज मिळते. बँका याच पैशातून ग्राहकांना कर्ज पुरवठा करत असते. रेपो रेट कमी झाल्यास बँकांना मिळणारे कर्ज स्वस्त मिळते. त्यामुळे ग्राहकांना सुद्धा दिलासा मिळतो. या दरावरुन गृह कर्ज, वाहन कर्जासह इतर कर्जांवरील ईएमआय स्वस्त किंवा महाग होतात.
महाराष्ट्र सरकारला मिळणार AI ची साथ मिळणार; गुगलसोबत मोठा करार…
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेटचा अर्थ विविध बँकांचे आरबीआयमध्ये जमा असलेल्या पैश्यावर बँकांना मिळणारं व्याज. रिव्हर्स रेपो रेटच्या माध्यमातून आरबीआय बाजारपेठातील कॅशच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवू शकते. बाजारात खूप रोख रक्कम असल्यास आरबीआय रिव्हर्स रेपोमध्ये वाढ करत असते. जेणेकरून बँका जास्त व्याज मिळवण्यासाठी आपल्याकडील जास्तीत-जास्त रोख रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करते.
सध्या कर्ज महाग की स्वस्त ?
वर्षभरात सहाव्यांदा रेपो रेटमध्ये बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे रेपो रेट 6.50 टक्के इतका आहे. रेपो रेट कमी झालेला नसल्यानं कर्ज घेणाऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. सध्याच्या रेपो रेटमध्ये कर्ज महागच आहे. पण त्याआधी सुमारे पावणे दोन वर्षांत रेपो रेट सहा वेळा वाढला आहे. 2022 मधील मे महिन्यात रेपो रेट चार टक्कांवरून 4.40 टक्के वाढविला होता. या वर्षात जून महिन्यात रेपो रेटमध्ये अर्धा टक्का वाढून तो 4.90 टक्के करण्यात आला. तर सप्टेंबर महिन्यात 5.90 टक्के वाढविण्यात आला. तर 2022 डिसेंबर महिन्यात रेपो रेट पुन्हा वाढून तो 6.25 टक्के इतका करण्यात आला. 2023 मध्ये फेब्रुवारी महिन्यात रेपो रेट 6.50 पर्यंत वाढविण्यात आलाय. त्यानंतर गेल्या वर्षभरात रेपो रेट जैसे थेच आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त कर्ज सध्या तरी मिळत नाही.
महागाई नियंत्रणात ठेवणे ?
देशात महागाईचा दर वाढला आहे. त्यामुळे महागाई आणखी वाढू नये म्हणून रेपो रेट वाढविला जातो. रेपो रेट वाढवून रिझर्व्ह बँक कर्जे महाग करते. त्यातून महागाई कमी केली जाते. आता देशात अन्न पदार्थाच्या वाढत्या किंमतीबद्दल आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी चिंता व्यक्त केली आहे.