Download App

डॉलरच्या तुलनेत रूपया घसरला पण तुमच्या काय परिणाम होणार? जाणून घ्या…

Rupee fall against dollar सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे डॉलरच्या तुलनेत फक्त घसरलेलाच नाही तर रसातळाला पोहचलेल्या रूपयाची.

Rupee fall against dollar : सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे डॉलरच्या तुलनेत फक्त घसरलेलाच नाही तर रसातळाला पोहचलेल्या रूपयाची. मात्र डॉलरच्या तुलनेत रूपया का घसरला? याचा तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांवर याचा नक्की काय परिणाम होणार? हे जाणून घेऊ सविस्तर… आज (सोमवार, 2 फेब्रुवारी) सकाळी सुरूवातीला डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत 86.62 पैसे एवढी होती. मात्र त्यानंतर 67 पैशांनी घसरण झाली आणि इतिहासात पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत 87.29 वर पोहचली. त्यावरून आता एकीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे.

मंत्रालय प्रवेशासाठी फेस आयडी, अधिकाऱ्यांच्या डोक्याला ताप अन् 100 कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क

दरम्यान आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी रुपया 87 रुपयांपर्यंत मार्च महिन्यापर्यंत घसरेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्याच दिवशी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयानं नीचांकी पातळी गाठलीय. मात्र रूपया का घसरला? पाहुयात… ‘टॅरिफ मॅन’ म्हणवून घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा अन् मेक्सिकोवर 25 टक्के अन् चीनवर 10 टक्के अतिरिक्त कर लादलाय. त्यामुळे मागील सत्रात 108.370 वर असणारा डॉलर निर्देशांक 109.25 वर पोहोचला. जो सहा प्रमुख जागतिक समकक्षांच्या तुलनेत अमेरिकन चलनाचे मूल्य मोजतो. त्यामुळे रूपयाचे मुल्य घसरले आहे.

वाचाळवीर… शास्त्री महाराजांचं वक्तव्य जातीयवादी! मराठा समाज संतापला

ज्या प्रमाणे वस्तूंच्या बाजारामध्ये त्यांच्या किंमती त्यांच्या मागणी आणि पुरवठ्यावर ठरताता. त्याचप्रमाणे परकिय चलन बाजारात कोणत्याही चलनाची किंमत ही त्याच्या मागणीवर ठरत असते. मात्र पुरवठा स्थिर आणि मागणी वाढली तर किंमत वाढते. तसेच पुरवठा वाढला आणि मागणी कमी झाली तर किंमत कमी होते. पर्यायी ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षित करावं लागतं. त्यामुळे सध्या डॉलरची मागणी जास्त असल्याने त्याची किंमत वाढत आहे. ज्यामुळे खरेदी करताना रूपयाची किंमत कमी होतं आहे.

कल्लाच! बड्स ब्लूटूथ शिवाय तर, हेडफोन वायरलेस होणार; सॅमसंगनं आणलेली भन्नाट टेक्नोलॉजी काय?

मात्र डॉलरच्या तुलनेत रूपया घसरला या आंतरराष्ट्रीय घडामोडीचा आपल्या सारख्या सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर ते गणित समजून घेऊ… रूपया घसरल्याने परदेशातून आयात करणे महाग होते. परिणामी अनेक जीवनावश्यक गोष्टी देखील महाग होतात. उदाहरण म्हणजे भारताला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करावे लागते.

अबब! राज्यात तब्बल 38 हजार कोटींची फसवणूक; मुंबईकर पहिल्या तर, चोखंदळ पुणेकर दुसऱ्या स्थानी

जे डॉलरमध्ये घ्यावे लागते. ते जास्त रूपये मोजून घ्यावे लागल्याने इंधनांच्या किंमती वाढतात. तसेच परदेश यात्रा, शिक्षण देखील महाग होते. तसेच भारतीय बाजारातून परदेशी गुंतवणुकदार गुंतवणुक काढून घेतात. दुसरीकडे रूपया घसरल्याने भारतीय निर्यातदारांना मात्र फायदा होतो. कारण त्यांची उत्पादन परदेशात स्वस्त होतात. मात्र रूपया घसरने योग्य नाही. त्यामुळे व्यापारातील तूट वाढते. अशा प्रकारे डॉलरच्या तुलनेत रूपया घसरल्याने तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांवर परिणाम होतो.

follow us