मंत्रालय प्रवेशासाठी फेस आयडी, अधिकाऱ्यांच्या डोक्याला ताप अन् 100 कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क

  • Written By: Published:
मंत्रालय प्रवेशासाठी फेस आयडी, अधिकाऱ्यांच्या डोक्याला ताप अन् 100 कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क

मुंबई प्रतिनिधी, प्रशांत गोडसे

CM Devendra Fadnavis :  राज्यातील महाविकास आघाडी (MVA) कोसळल्यानंतर महायुतीचे (Mahayuti) सरकार स्थापन झाले. राज्यात काॅमन मॅन म्हणून ओळख निर्माण करणारे, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वसामान्यांना मंत्रालयात थेट प्रवेश दिला होता. मात्र,आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या महायुती सरकारने मंत्रालय प्रवेशासाठी सुरक्षेच्या कारणास्तव नवीन प्रणाली म्हणजेच एफआरएस प्रणाली आणल्यामुळे सामान्य नागरिकांना प्रवेशासाठी अडचणी सहन कराव्या लागत असतांना आता मंत्रालयातील अधिकारी,कर्मचार्यांना सुद्धा त्याचा फटका बसत आहे. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर प्रवेशासाठी पोलिसांसोबत मंत्रालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे खटके उडतांना दिसून येत आहे.

मंत्रालयाच्या प्रवेशासाठी राज्य सरकारने मंत्रालयात आता फेस आयडी पद्दतीने प्रवेश देण्याची पध्दत सुरू केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना सुद्धा ज्या विभागाशी काम आहे. त्याच ठिकाणी प्रवेश मिळणार असून इतर ठिकाणी कुठेही मुक्तसंचार करता येणार नाही. मात्र, या नाविण्य उपक्रमाचे पहिले बळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी, मंत्र्यांच्या कार्यालयातील स्टाफ आणि ओएसडी ठरले आहे.

सोमवारी नेहमीप्रमाणे एका बड्या मंत्र्यांचे ओएसडी ज्यांचे फेस रिंडींग सुद्धा झाले आहे. ते आकाशवाणी गेटवरून प्रवेश करत होते.मात्र, ऐनवेळी त्या मशीनमध्ये बिघाड झाला. फेस रिडींग होऊनही त्यांना मशीन बिघाडामुळे प्रवेश मिळेना, त्यांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसांना आपण ओएसडी असल्याचेही कळवले. मात्र, पोलीस अधिकारी ऐकायला तयार नव्हते. तुम्ही ओएसडी असा किंवा कुणीही जा पास काढा आणि प्रवेश करण्याचा थेट सल्ला देऊन टाकला, तर इतरही कर्मचारी, अधिकारी ज्यांची फेस रिंडीग झाली नाही. त्यांना थेट पास काढण्याच्या रांगेत आज उभे राहावे लागले त्यामुळे मंत्रालयातील प्रवेशद्वारावरील पोलीसांमध्ये आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दीक चकमक उडाल्याची दिसून येत आहे.

‘त्या’ करिता नरहरी झिरवाळ अन्न औषध प्रशासन मंत्री पुढाकार घेणार

मंत्रालयात अनेक ज्येष्ठ नागरिक येत असतात त्यांना इमर्जन्सी औषध किंवा पाणी बॉटल नेण्यासंदर्भात काही करता येईल का? यासाठी आपण पुढाकार घेऊ त्यासाठी लवकरात लवकर संबंधित विभागाच्या मंत्री आणि सुरक्षा  विभागाशी चर्चा करणार असल्याची माहिती अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली.

कल्लाच! बड्स ब्लूटूथ शिवाय तर, हेडफोन वायरलेस होणार; सॅमसंगनं आणलेली भन्नाट टेक्नोलॉजी काय?

पूर्वकल्पना देणे आवश्यक होते

राज्य सरकारने मंत्रालय प्रवेशासाठी घेतलेल्या निर्णयापुर्वी शासनाने त्याची पूर्वकल्पना देणे आवश्यक होते. त्यासंदर्भात ट्रेनिंग द्यायची असते. मात्र, त्याची पुर्वकल्पना किंवा तांत्रीक बाबी पुर्ण केल्या नाही. त्यामुळे आता कर्मचारी, अधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. शिवाय, सोमवारी सुमारे 100 लोकांना लेटमार्क लागले आहे. – ग दी कुलथे, अध्यक्ष, शासकीय कर्मचारी संघटना

follow us
  • fb
  • instagram
  • youtube