Download App

SEBI ने केला finfluencers चा ‘गेम’; यापुढे यूट्यूब अन् टेलिग्रामवर देता येणार नाही ‘स्टॉक टिप्स’

  • Written By: Last Updated:

SEBI On Finfluencers : शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच (SEBI) ने शेअर बाजाराशी संबंधित स्टॉक टिप्स देणाऱ्या फिनफ्लुएंसर्सला मोठा झटका दिला आहे. सेबीच्या नव्या नियमानुसार यापुढे नोंदणी नसलेल्या फिनफ्लुएंसर्सला गुंतवणुकदरांना शिक्षणाच्या नावाखाली शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देता येणार नाहीये. सेबीच्या या आदेशानंतर आता सेबीकडे नोंदणी नसणाऱ्या फिनफ्लुएंसर्सच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत बुधवारी (दि. 29) SEBI ने एक परिपत्रक जारी केले आहे.

Joint Home Loan : जॉइंट होम लोन घेणे किती योग्य? जाणून घ्या, फायद्याचं गणित

सेबीचा आदेश नेमका काय?

सेबीने काढलेल्या आदेशाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, शेअर बाजाराच्या शिक्षण देणाऱ्या व्यक्ती येथून पुढे थेट म्हणजेच सध्याच्या बाजारभावाचा वापर करू शकणार नाहीत. तसेच गुंतवणुकदारांचे प्रबोधन करण्यासाठी संबंधित व्यक्तींना तीन महिने जुन्या किमतींचे उदाहरण घ्यावे लागेल. याचा अर्थ आता Finfluencers लाईव्ह मार्केटमधील स्टॉक्सबाबत कोणत्याही टिप्स किंवा शिफारसी देऊ शकणार नाहीत. तसेच लाइव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग कशी करावी आणि त्याद्वारे स्टॉक टिप्स आणि ट्रेडिंग कॉल्स देऊ शकणार नाहीत.

फायनान्शियल इन्फ्लुएंसर रवींद्र भारतींना शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचेही सेबीचे आदेश

सेबीमुळे लागणार लगाम

मागील वर्षी, 22 ऑक्टोबर 2024 रोजी, सेबीने नोंदणीकृत आणि नोंदणीकृत नसलेल्या संस्थांमधील भागीदारीवर बंदी घालणारे परिपत्रक जारी केले होते. मात्र आता या नव्या परिपत्रकामुळे गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक टिप्सच्या नावाखाली सुरू असलेल्या फिनफ्लुएंसर्सच्या नाड्या आवळल्या आहेत. त्यामुळे सेबीकडे नोंदणीकृत नसलेल्या पण यू-ट्युब किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून गुंतवणुकदारांना शिक्षणाच्या नावाखाली स्टॉक खरेदी विक्रीबाबत टिप्स देणाऱ्या फिनफ्लुएंसर्सवर लगाम लागण्याची अपेक्षा आहे. परंतु, SEBI च्या या पावलानंतर Finfluencers च्या ग्राहकसंख्येमध्ये मोठी घट होऊ शकते.

follow us