Download App

Sensex Closing Bell : 1109 अंकांनी कोसळला सेन्सेक्स; गुंतवणुकदारांचे 14 लाख कोटी बुडाले

Sensex Closing Bell : आज शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामध्ये बीएसईच्या सेन्सेक्समध्ये ( Sensex Closing Bell ) 1100 अंकांहून अधिक घसरण झाली. तर निफ्टी देखील एक टक्क्यांहून अधिक खाली आली. तर स्मॉल कॅप इंडेक्समध्ये पाच टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली. एका दिवसामध्ये झालेली ही डिसेंबर 2022 नंतरचे सगळ्यात मोठी घसरण मानली जात आहे.

CM शिंदेंनी शिवतारेंना आवरावं, अन्यथा औकात दाखवू…; अमोल मिटकरींचा हल्लाबोल

मिडकॅप इंडेक्समध्ये देखील तीन टक्के घसरण झाली आहे. तर मायक्रोकॅप्स आणि एसएमई स्टॉक इंडेक्सवर पाच टक्के घसरण पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 14 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये सर्वात जास्त तेजी ही आयटीसीच्या शेअरमध्ये राहिली. तसेच नेस्ले, टीसीएस, विप्रो आणि एचडीएफसी बँक हे देखील तेजीत होते. तर दुसरीकडे एनटीपीसी, पावर ग्रिड, ओएनजीसी, भारती एअरटेल, टाटा स्टील आणि सन फार्मा या शेअर्स मध्ये सर्वात जास्त घसरण झाली.

सेन्सेक्स का कोसळला?

तज्ञांच्या म्हणण्यानुसार सेन्सेक्स कोसळण्यामागे अनेक कारण आहेत. त्यासाठी सेबीने गेल्या महिन्यातच म्युच्युअल फंड्सला स्मॉल कॅप आणि मिडकॅप इन्वेस्टरच्या हितासाठी एक सिस्टीम बनवायला सांगितली होती. सेबीच्या चेअरमन माधवी पुरी यांनी सोमवारीच सांगितलं होतं की, मार्केटमध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्याला काही लोक बुडबुडा म्हणू शकतात. ही स्थिती रोखण्याची गरज आहे.

>‘फडणवीसांना एक चूक महागात पडणार’; मनोज जरांगेंनी कडक शब्दांत सुनावलं

तसेच अनेक ब्रोकरेज आणि दिग्गज गुंतवणूकदारांनी स्मॉल कॅपच्या शेअर्सच्या व्हॅल्युएशनवर सावधगिरी बाळगली आहे. त्याचबरोबर महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये ईडीने केलेल्या कारवाईमुळे देखील अनेक शेअर्समध्ये घसरण झाली आहे. यामध्ये ईडीने दुबईतील हवाला व्यवसायिक हरिशंकर टिबरवाल यांच्याशी संबंधित डिमॅट अकाउंटमध्ये जमा असलेले अकराशे कोटी रुपयांचे शेअर्स फ्रीज केले आहेत. ज्यांची तीस हून अधिक कंपन्यांच्या शेअर्समध्ये हिस्सेदारी आहे. त्यामध्ये सिगाची इंडस्ट्रीज, डेन्सोल इंजीनियरिंग, विकास एकोटेक, टोयम स्पोर्ट्स, एलकेपी फायनान्स यांचा समावेश आहे.

follow us