CM शिंदेंनी शिवतारेंना आवरावं, अन्यथा औकात दाखवू…; अमोल मिटकरींचा हल्लाबोल

CM शिंदेंनी शिवतारेंना आवरावं, अन्यथा औकात दाखवू…; अमोल मिटकरींचा हल्लाबोल

Amol Mitkari : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) जागावाटपाबाबत महायुतीत निर्माण झालेली तेढ अद्याप सुटलेली नाही. बारामतीची जागा अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र या लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी अजित पवारांविरोधात दंड थोटपले. अजित पवारांवर हल्लाबोल करत शिवतारेंनी आपण बारातमीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केलं त्यानंतर आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिवतारेंवर जोरदार टीका केली.

मागील 17 वर्षांत 121 लोकांची ED चौकशी; आकडेवारी सांगत शरद पवारांचा भाजपवर घणाघात 

गेल्या काही दिवसांपासून विजय शिवतारे हे अजित पवारांवर सातत्याने टीका करत आहे. आपण बारामतीतून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. यावर बोलतांना अमोल मिटकरी म्हणाले की, विजय शिवतारे ही व्यक्ती हलकट स्वभावाची असून आता ही व्यक्ती उर्मटपणाचा कळस करत आहे. ते अजित पवारांवर बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. महायुतीसोसबत राहून जर अजितदादांविरोधात बोलण्याचा हलकटपणा ते करत असतील तर आमचा नाईलाज आहे, असं मिटकरी म्हणाले.

Yodhha च्या रिलीजची तयारी करणाऱ्या राशीच्या खऱ्या आयुष्यातील योद्धा कोण? 

मिटकरी म्हणाले, शिवतारे स्वत: अपक्ष राहणार असल्याची मिजाज मारत आहे, काल मुख्यमंत्र्यांना विजय शिवतारे यांना आवर घालण्याची विनंती केली. मात्र तरीही ते आवरले जात नसतील तर त्यांना त्यांची लायकी, औकात आणि येणाऱ्या लोकसभेत त्यांनी त्याचं डिपॉझिट वाचवून दाखवावं, असं मिटकरी म्हणाले.

अजित पवारांवर भुंकण्याचा प्रयत्न करू नका, महाराष्ट्राला तुमचा हलकटपणा, उर्मटपणा माहीती आहे. त्यामुळं आपली पायरी पाहून वागावं नाहीतर शिवतारेंना राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यांची औकात दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा मिटकरी यांनी दिला.

शिवतारे काय म्हणाले होते?
अजित पवारांवर निशाणा साधत शिवतारे म्हणाले की, जनतेसाठी मी अनेकांशी पंगा घेतला. लोकसभेची निवडणूक समोर आहे. सुप्रिया ताई, सुनेत्रा ताई असं सुरू आहे. मात्र, बारामती लोकसभा हा कोणाचा सातबारा नाही. आम्ही का म्हणून त्यांना 10-10 वेळा मतदान का करावे? आम्हाला काहीच मिळालं नाही. इथेच अजित पवारांनी विजय शिवतारेंचा अपमान केला होता, आता बदला घेण्याची वेळ आली आहे, असे आव्हान शिवतारे यांनी अजित पवारांना दिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज