Yodhha च्या रिलीजची तयारी करणाऱ्या राशीच्या खऱ्या आयुष्यातील योद्धा कोण?
Yodhha : युवा पॅन इंडिया स्टार राशी खन्ना तिच्या अलीकडील चित्रपट योद्धाच्या ( Yodhha ) रिलीजसाठी तयारी करत असून ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान तिला तिच्या वास्तविक जीवनातील योद्धा कोण? या बद्दल विचारण्यात आले आणि याला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “माझी आई, माझे वडील आणि माझा भाऊ हे माझे योद्धा आहेत. मला वाटते की मी जे काही मिळवले आहे, आज मी जिथे आहे, ते सर्व माझ्या आई-वडील आणि भावाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे. माझ्या भावाने मला स्वत:बद्दल फारसा विश्वास नसतानाही मला प्रोत्साहन देऊन काम करण्याची प्रेरणा दिली आणि म्हणून मी आज इथपर्यंत आहे.”
ICC Test Ranking : रविचंद्रन अश्विन नंबर वन! आयसीसी क्रमवारीत भारताचाच बोलबोला
‘फर्जी’ नंतर लोकांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा खूप आहेत. “लोकांनी मला एक अभिनेत्री म्हणून पाहिलं पण ‘फर्जी’नंतर मला एक कलाकार म्हणून मान मिळाला. लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. पुन्हा एकदा मी या चित्रपटात दिसणार असून मला या बद्दल उत्सुकता आहे असं राशी म्हणते.
Bade Miyan Chote Miyan चं आणखी एक गाण प्रेक्षकांच्या भेटीला, टायगर-मानुषीचा चार्टबस्टर डान्स व्हायरल
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक असलेली राशी आता योद्धा चित्रपटातून बॉलीवूड जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे ज्यामध्ये ती एका सरकारी अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित, धर्मा प्रॉडक्शन समर्थित, 15 मार्च रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा-स्टार, राशी ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि ‘टीएमई’ मध्ये दिसणार आहे, ज्यात विक्रांत मॅसी आहे. तिच्याकडे तमिळ चित्रपट ‘अरनमानई 4’ आणि तेलुगू चित्रपट ‘तेलुसू काडा’ देखील आहे.