Sri Krishna Janmabhoomi : हायकोर्टाने उत्तर प्रदेशातील मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी (Sri Krishna Janmabhoomi) मंदिराला लागून असलेल्या शाही ईदगाह (Shahi Eidgah) परिसराचे तीन सदस्यीय समितीद्वारे कोर्टाच्या देखरेखीखाली प्राथमिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली होती. या विरोधात मुस्लिम पक्षकाराने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावत सुप्रीम कोर्टाने मुस्लिम पक्षकाराला दणका दिला आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या 14 डिसेंबरच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. आता पुढील सुनावणी 9 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे.
श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह वाद प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने गुरुवारी निकाल दिला होता. श्रीकृष्ण जन्मभूमी वादात वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. यासाठी तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाहचे प्रकरण अनेक वर्षांपासून कायदेशीर गुंतागुंतीत अडकले होते. श्रीकृष्ण जन्मस्थानाचे सर्वेक्षण करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात अलाहाबाद हायकोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिला होता. कोर्टाची कमिटी वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करणार आहे.
कोणी केली होती ही याचिका?
सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिका भगवान श्री कृष्ण विराजमान आणि हरिशंकर जैन, विष्णू शंकर जैन, प्रभा पांडे आणि देवकी नंदन यांच्यामार्फत दाखल केली होती. यामध्ये असा दावा केला होती की त्या मशिदीच्या खाली भगवान कृष्णाचे जन्मस्थान आहे आणि मशीदच्या जागेवर हिंदू मंदिर असल्याचे सिद्ध करणारे अनेक पुरावे आहेत.
काँग्रेसचे ‘मिशन महाराष्ट्र’; राहुल, सोनिया गांधीसह दिग्गज नेते नागपूरात
न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या एकल खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. याबाबत श्रीकृष्ण विराजमान यांच्या वतीने हायकोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. वकिलांच्या कमिटी मार्फत सर्वेक्षण करण्याची मागणी अर्जात करण्यात आली होती. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांनी 16 नोव्हेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता.
भारताचा कांद्याबाबत मोठा निर्णय; मालदीवसह शेजारील पाच देशांमध्ये सामान्य लोकांची होरपळ
हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांच्या म्हणण्यानुसार, याचिकेत दावा करण्यात आला होता की,तिथं कमळाच्या आकाराचा स्तंभ होता जो हिंदू मंदिरांचे वैशिष्ट्य आहे तसेच भगवान कृष्णाच्या जन्माच्या रात्री त्यांचे रक्षण करणाऱ्या हिंदू देवतांपैकी एक शेषनागची प्रतिकृती आहे. सर्वेक्षणानंतर विहित मुदतीत अहवाल सादर करण्यासाठी विशिष्ट निर्देशांसह आयोग स्थापन करण्यात यावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.