Download App

MP Suspension: 92 खासदारांचं निलंबन, इंडिया आघाडीची रणनीती ठरली

MP Suspension: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ केल्यामुळे खासदारांना निलंबित केल्याच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीतील (INDIA Alliacne) नेते आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनातून 90 हून अधिक खासदारांच्या निलंबनाविरोधात इंडिया अलायन्सने रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया अलायन्स मंगळवारपासून (19 डिसेंबर) संसदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार आहे. या आघाडीचे खासदार लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत.

या अधिवेशनात आतापर्यंत एकूण 92 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान सोमवारी कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहांसह 78 खासदारांना निलंबित करण्यात आले. लोकसभेतील 33 आणि राज्यसभेतील 45 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

‘मोदी अन् भागवतांच्या भेटीचा तपशील द्या’; आंबेडकरांचं खुलं चॅलेंज

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी विरोधी खासदारांचे निलंबन हे हुकूमशाही पाऊल असल्याचे म्हटले आहे. सरकार विरोधकांना चिरडण्यासाठी संसदेत बुलडोझरचा वापर करत आहे, असा आरोप केला आहे.

‘शिंदे समितीचा राज्यमंत्र्यांचा दर्जा असंवैधानिक, यांना बाहेरचा रस्ता दाखवा’; अ‍ॅड. सदावर्तेंचं विधान

सोमवारी लोकसभेच्या अध्यक्षपदाचा अवमान केल्याच्या आरोपावरून काँग्रेसच्या एकूण 33 खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले, त्यापैकी 30 सदस्यांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे, तर तीन खासदारांना विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

राज्यसभेच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या 34 खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे, तर विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत 11 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

Tags

follow us