Download App

कोलकाता बलात्कार अन् खून प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपीने वापरलेली गाडी पोलीस आयुक्ताच्या नावावर

कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. यातील आरोपी संजय रॉयने वापरलेली गाडी पोलिसाच्या नावावर.

  • Written By: Last Updated:

Kolkata Rape Case : कोलकाता येथे काही दिवसांपूर्वी महिला डॉक्टरवर बलात्कार करत तीचा खून केल्याची घटना घडली. त्यानंतर देशभरात या घटनेचे पडसाद उमटले. आजही त्या घटनेचे पडसाद उमटत आहेत. (Kolkata Rape Case ) अशातच आता येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या घटनेतील बलात्कारी आरोपीनं वापरलेली मोटारसायकल कोलकाता पोलीस आयुक्तांच्या नावावर असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या माहितीमुळे या प्रकरणाला नव वळण मिळण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! कोलकाता रेप प्रकरणातील आरोपी संजय रॉयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मोठा खुलासा

आरजी कार रुग्णालयातील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या करणाऱ्या आरोपीने वापरलेल्या मोटारसायकलबद्दल धक्कादायक खुलासा समोर आला आहे. महिला डॉक्टरच्या हत्येनंतर आरोपी संजय रॉय ज्या मोटारसायकलवर शहरभर फिरला ती मोटारसायकल कोलकाता पोलीस आयुक्तांच्या नावावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत आता वेगवेळी चर्चा सुरू झाली आहे. तसंच, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतली

कोलकात्याच्या आरजी कार हॉस्पिटलमध्ये बलात्कार आणि हत्या करण्यापूर्वी संजय रॉय रेड लाईट एरियात गेला होता. 8-9 ऑगस्टच्या रात्री ही मोटारसायकल संजय रॉयने वापरली. तीच मोटारसायकल कोलकाता पोलीस आयुक्तांच्या नावाने नोंदणीकृत आहे. या मोटारसायकलीवरून तो रेड लाईट एरियात गेल्याचेही स्पष्ट झालं आहे. दारूच्या नशेत त्याने 15 किलोमीटर मोटारसायकल चालवली, यावरून पोलिसांची मोठी चूक दिसून येते. मिळालेल्या माहितीनुसार, या बाईकची नोंदणी 2014 मध्ये झाली होती. या खुलाशानंतर सीबीआयने ती ताब्यात घेतली आहे.

शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली; बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेवरून केलं बेताल वक्तव्य

इतकी जवळीक कशी?

या घटनेतील आरोपी संजय रॉय यांने पोलीस आयुक्तांच्या नावावर दुचाकीची नोंदणी कशी केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर हे खरे असेल तर तेव्हा संजय रॉय आणि पोलिसांमध्ये इतकी दोस्ती कधी आणि कशी झाली अशीही चर्चा सुरू झाली आहे. संजय रॉय याला वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलं होतं का? या प्रश्नांचीही आता सीबीआय चौकशी करत आहे. ९ ऑगस्टच्या घटनेनंतर कोलकाता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संजय रॉयला अटक केली. परंतु, तपासाअंती नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे या तपासात सीबीआयकडून आणखी खोलात तपास सुरू करण्यात आला आहे.

follow us