Download App

प्रवाशांना बसणार भुर्दंड! निवडणूक संपताच टोल दरात 5 टक्क्यांची वाढ, आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू…

कसभा निवडणुक (Lok Sabha Elections) संपताच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला आता मोठा भुर्दंड बसणार आहे.

Toll Tax Rate Hiked : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) संपताच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला आता मोठा भुर्दंड बसणार आहे. कारण, कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highways Authority of India) (Increase in toll rates) मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज (2 जूनच्या) मध्यरात्रीपासून देशभरातील सर्व महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरील टोल टॅक्समध्ये वाढ होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कार, बस आणि ट्रकच्या टोल टॅक्समध्ये तीन ते पाच टक्क्यांनी वाढ केली आहे.

अजित पवारांचे तीन आमदार विजयी, राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी हालचाली सुरू

एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, टोल टॅक्सच्य किमती वाढवणे ही वार्षिक प्रक्रिया आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे अद्याप टोल टॅक्सचे दर वाढवू नयेत, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. यानंतर NHIA टोलच्या दरात वाढ केली नव्हती. मात्र, आता लोकसभा निवडणुका संपताच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) अनेक राज्यांमधील टोलचे दर जाहीर केले. टोलचे दर वाढवण्याची परवानगीही मुख्यालयाकडून मिळाली. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने टोल दरात वाढ करण्याच्या NHAI च्या प्रस्तावालाही मान्यता दिली आहे.

Beed Loksabha : बजरंग सोनवणेंची निवडणूक अधिकाऱ्यांना धमकी, ‘अन्यथा स्वत:ला संपवून घेऊ… 

दरम्यान, रविवारी (आज) मध्यरात्री 12 पासून टोल दरवाढ लागू होणार आहे. त्यानुसार प्रत्येक टोलमागे 3 ते 5 टक्के वाढ करण्यात येणार आहे. देशभरात सुमारे 1100 टोल नाके आहेत. ही वाढ या सर्व टोलनाक्यांवर होणार आहे.

किती पडणार भूर्दंड?

मेरठ-बागपत राष्ट्रीय महामार्गावर, सर्वात कमी टोल 45 रुपये आणि सर्वाधिक टोल 295 रुपये असेल. दिल्ली-सहारनपूर राष्ट्रीय महामार्गावरील जिवाना टोलवर किमान टोल 90 रुपये आहे, तर सर्वाधिक टोल 890 रुपये असेल. झाशी-कानपूर महामार्गावरून झाशीकडे येणाऱ्या वाहनांना सेमरी टोल नाक्यावर 5 ते 1500 रुपये जास्त मोजावे लागतील.

मासिक पास बनवण्याचे दरही वाढले
NHAI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशभरात टोल टॅक्स 5 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. टोल नाक्याच्या 20 किमी परिघात राहणाऱ्या लोकांसाठी मासिक पास बनवण्याचे दरही वाढले आहेत. टोल नाक्याच्या 20 किमीच्या परिघात राहणाऱ्या लोकांना आता फास्ट टॅगसाठी दरमहा 10 रुपये अधिक मोजावे लागतील. मासिक फास्ट टॅगची किंमत आता 330 रुपयांऐवजी 340 रुपये असेल.

 

follow us