Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर (Union Budget 2024) करणार आहेत. या अर्थसंकल्पातून केंद्र सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करणार, कोणत्या क्षेत्रासाठी किती निधीची तरतूद करणार याकडे देशवासियांचे लक्ष राहणार आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारामनही (Nirmala Sitharaman) आजच्याच दिवशी एक खास रेकॉर्ड करणार आहेत. आज बजेट सादर केल्यानंतर त्यांच्या नावावर 5 पूर्ण आणि आजचे अंतरिम बजेट असे एकूण 6 बजेट सादर केल्याची नोंद होईल. सलग सहा वेळा अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा विक्रम माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा आहे.
जुलै 2019 पासून सितारामन यांनी एकूण 5 पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. आज त्यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यांचे नावे सहा अर्थसंकल्प होतील. याआधी मनमोहन सिंह, अरुण जेटली, पी. चिदंबरम आणि यशवंत सिन्हा यांनी प्रत्येकी 5 अर्थसंकल्प सादर केले आहेत. या सर्वांना सितारामन आज मागे टाकतील. सन 2019 पासून निर्मला सितारामन यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनीही या मंत्रालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला.
Budget 2024 : बजेटमध्ये घोषित केलेल्या मोदी सरकारच्या ‘त्या’ योजनांचं काय झालं? जाणून घ्या