Download App

Video : भारताची राष्ट्रीय भाषा कोणती?; DMK नेत्या कनिमोझींच्या उत्तराने स्पेनमध्ये टाळ्यांचा कडकडाट

  • Written By: Last Updated:

What Is India’s National Language?’ Kanimozhi Was Asked In Spain : एकीकडे भारतात विविध भाषांवरून आणि नेकमी राष्ट्रीय भाषा कोणती यावरून वाद सुरू असून, याचसंबंधीचा प्रश्न आता स्पेनमध्ये विचारण्यात आला आहे. मात्र, ज्या महिला नेत्याला हा प्रश्न विचारण्यात आला त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या हजरजबाबीपणाच्या उत्तराने अक्षरक्षः टाळ्यांचा कडकडाट झाला. द्रमुक नेत्या आणि खासदार कनिमोझी करुणानिधी (Kanimozhi Karunanidhi) यांनी दिलेल्या या उत्तरानंतर जरी आपल्या देशात भाषावाद असला तरी, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत एक असल्याचे या उत्तरामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

भारतीय भाषांतली पुस्तके अन् तीही डिजीटल; केंद्र सरकारच्या या योजनेत काय खास?

नेमकं काय झालं? 

सध्या, ऑपरेशन सिंदूर (Opration Sindoor) आणि पाकिस्तानच्या दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी अनेक भारतीय नेते  जगाभरातील विविध देशांना भेटी देत ​​आहेत. याचाच एकभाग म्हणून द्रमुक खासदार कनिमोझी करुणानिधी स्पेनमधील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी (दि.2) माद्रिदमध्ये प्रवासी भारतीयांच्या गटाला संबोधित केले. त्यावेळी एका परदेशी व्यक्तीने त्यांना विचारले की, “भारताची राष्ट्रभाषा कोणती असावी आणि त्याबाबत त्यांची भूमिका काय आहे?”

या प्रश्नाला उत्तर देताना कनिमोझी यांनी कोणत्याही एका भाषेचा उल्लेख न करता अगदी सहजपणे भारताची राष्ट्रीय भाषा ‘विविधतेत एकता’ असल्याचे उत्तर दिले. हाच संदेश हे प्रतिनिधी मंडळ जगाला देत आहे. त्यांच्या या उत्तरानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.  यावेळी त्यांनी संपूर्ण जगाने दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याची आता वेळ आली असल्याचेही सांगितले.

प्रश्न का विचारला गेला

खरंतर, हा प्रश्न आणि त्यांचे उत्तर तामिळनाडूतील द्रमुक सरकार आणि केंद्रात भाषेवरून झालेल्या तीव्र संघर्षामुळे, विशेषतः राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० मधील त्रिभाषा सूत्रावरील वादामुळे समोर आला. मात्र, देशात जरी भाषेवरून वाद असला तरी देश म्हणून आम्ही एक असल्याचे आणि भारताची राष्ट्रीय भाषा ‘विविधतेत एकता’ हीच असल्याचे कनिमोळी यांनी सांगितले.

भाषा वाद विकोपाला! तामिळनाडूने बजेटमध्ये हटवलं रुपयाचं चिन्ह, कारणही धक्कादायक

कनिमोळींच्या टीममध्ये कोण कोण?

द्रमुक खासदार कनिमोझी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ यापूर्वी ग्रीसला पोहोचले होते. कनिमोझी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात राजीव राय (समाजवादी पक्ष), मियां अल्ताफ अहमद (जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स), ब्रिजेश चौटा (भाजपा), प्रेम चंद गुप्ता (राष्ट्रीय जनता दल), अशोक कुमार मित्तल (आम आदमी पक्ष) आणि माजी राजदूत मंजीव एस पुरी आणि जावेद अशरफ यांचा समावेश आहे.

follow us