Download App

धक्कादायक! पोस्टमार्टमला घेऊन जाण्याआधीच उठला अन् म्हणाला, “मी जिवंत..” हॉस्पिटलमध्ये खळबळ

Bihar News : बिहारमधील नालंदा जिल्ह्यातून एक हैराण (Bihar News) करणारी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीला पोस्टमार्टमसाठी घेऊन जाण्यात येत होते. आता पोस्टमार्टम मृतदेहाचेच होते जिवंत माणसाचं कसं होईल हे सगळ्यांनात माहिती आहे. तसंच तुम्हालाही वाटत असेल पण थांबा खरा ट्विस्ट तर पुढेच आहे. रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी एका जणाला घेऊन जात असतानाच वेगळंच घडलं. स्ट्रेचरवरील व्यक्ती अचानक उठून बसला. हा प्रकार घडताच सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येथील बिहारमधील (Bihar) नालंदा जिल्ह्यातील एका रुग्णालयात एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडला होता. येथील कर्मचारी आणि अन्य लोकांनी त्याला उठवण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु, तो काही उठत नव्हता. त्यामुळे व्यक्ती मरण पावल्याचे गृहीत धरून या प्रकाराची माहिती पोलिसांना (Bihar Police) देण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनाही हा व्यक्ती मयत झाल्याचे वाटले. यानंतर या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना एफएसएल पथकाला देण्यात आल्या. पोलीस या पथकाची वाट पाहत होते. या दरम्यान या प्रकाराची माहिती सिव्हील सर्जन डॉ. जितेंद्र कुमार सिंह यांना देण्यात आली. सिव्हील सर्जनने व्यक्तीची नाडी न तपासताच त्याला पोस्ट मार्टमला पाठवण्याचे आदेश दिले.

Bihar Politics : उमेदवार निवडीत पॉलिटिक्स; एकाच वेळी 22 नेत्यांनी सोडली चिराग पासवानांची साथ

पोस्ट मार्टमला घेऊन जाणार हे शब्द कानी पडताच इतका वेळा मृत वाटत असलेला युवक उठून बसला. या घटनेने सगळेच आवाक झाले काहीसे घाबरलेही. थोड्याच वेळात ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी लागलीच या व्यक्तीला ताब्यात घेत चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

हा सगळा प्रकार नालंदा जिल्ह्यातील एका दवाखान्यात घडला. स्वच्छतागृह साफ करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी दरवाजा उघडू लागले असता दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बराच वेळानंतरही दरवाजा उघडला गेला नाही. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजाचा वरील भाग तोडून पाहिल्यावर एक व्यक्ती पडल्याचे दिसले.

यानंतर त्याला मृत समजून फॉरेन्सिक टीमला माहिती देण्यात आली. हॉर्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या व्यक्तीला पोस्टमार्टमला घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचर मागविण्यात आले. त्याचवेळी हा व्यक्ती उठून बसला. या व्यक्तीकडे पोलिसांनी चौकशी केली. यावेळी त्याने त्याचे नाव राकेश कुमार असे सांगितले. औषधे घेण्यासाठी दवाखान्यात आलो होतो असेही त्याने सांगितले.

Bihar Politics : आधी मासे, आता संत्री! भाजपला खिजवण्यासाठी यादव-सहनींचे ऑरेंज पॉलिटिक्स

follow us