Download App

केजरीवालांच्या अडचणीत वाढ, औषध घोटाळ्याप्रकरणी राज्यपालांनी दिले CBI चौकशीचे आदेश

  • Written By: Last Updated:

Arvind Kejriwal : मद्य घोटाळा समोर आल्यानंतर केजरीवाल सरकारच्य अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. आताही केजरीवाल सरकारने सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषध खरेदी केल्याचे (drug scam) वृत्त आहे. दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमधील बनावट औषधांबाबत दक्षता विभागाने आपला अहवाल नायब राज्यपाल व्हीके सक्सेना (Deputy Governor VK Saxena) यांना सादर केला. यानंतर एलजी सक्सेना यांनी तत्काळ मुख्य सचिव नरेश कुमार यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी आणि सीबीआय (CBI) तपासाचे निर्देश दिले आहेत. त्यामुळं केजरीवाल सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

झुंडशाहीला प्रशासन बळी पडतंय का? जरांगेंच्या सभेपूर्वी शाळांना सुट्टी दिल्याने भुजबळांचा संताप 

सक्सेना यांनी औषध घोटाळ्याप्रकऱणी सीबीआयला तपास करण्याची निर्देश दिले. सरकारी रुग्णालयाच्या औषध खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप राज्यपालांनी केला.

आधीच दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयकडून आप नेत्यांची चौकशी सुरू आहे. मद्य घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुरुंगात आहेत. आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह हे देखील मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. दोन्ही नेत्यांच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ झाली आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही या प्रकरणात अडकल्याचे दिसत आहे. ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. त्यांना ३ जानेवारीला ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे

आरोग्यमंत्र्यांना पदावरून तात्काळ हटवा : भाजप

एलजीच्या या सूचनेनंतर दिल्लीतील भाजप नेत्यांनी केजरीवाल सरकारवर हल्लाबोल झाले आहेत. दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि खासदार मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. दिल्ली सरकार आणि आरोग्य मंत्री लोकांच्या जीवाशी खेळत असल्याची टीका त्यांनी केली. भारद्वाज यांना तातडीने पदावरून हटवा, अन्यथा आंदोलन करू असा इशाराही भापजने दिला.

Tags

follow us