Waqf Board Bill : लोकसभेत काल वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक (Waqf Board Bill ) मंजूर करण्यात आलं. तब्बल 12 तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर रात्री उशिरा आवाजी मतदान पद्धतीने वक्फ बोर्ड बिल लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर आज राज्यसभेत हे बिल सादर करण्यात आलंय. या बिलाच्या मुद्द्यावरुन देशभरातून संतापाची लाट उसळत असतानाच आझाद पार्टीचे खासदार चंद्रशेखर आझाद यांनी आक्रमक पवित्रा घेतलायं. वक्फ बोर्ड विधेयकाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार असून वेळ पडल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशारा आझाद यांनी दिलायं.
दिशा सालियन प्रकरणात ट्विस्ट, दिशाच्या लॅपटॉपमधून धक्कादायक माहिती; व्हॉट्सअप डेटा कुणाचा?
पुढे बोलताना चंद्रशेखर आझाद म्हणाले, वक्फ बोर्ड बिल हे संविधान विरोधी असून लोकसभेत ज्या खासदारांनी बिलाला समर्थन दिलंय, त्यांना जनता माफ करणार नाही. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत लोकसभेत आहे हे आम्हाला माहित होतं पण आम्ही शेवटपर्यंत लढलो आता लोकसभेत बिल मंजूर झालंय जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत संविधानाच्या विरोधात जे काही होत असेल त्याविरोधात आम्ही लढणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
Waqf Board Bill : अंबानींचं घर वक्फ बोर्डाच्या जमीनीवर; जितेंद्र आव्हाडांचा दावा…
तसेच आता वक्फ बोर्ड विधेयकाविरोधात आम्ही कोर्टात जाणार असून वेळ पडल्यास रस्त्यावरही उतरतणार आंदोलन करणार आहेत. हे विधेयक मुस्लिमविरोधात नाही असं सांगण्यात येत आहे, पण नगीना मतदारसंघातील मुस्लिम लोकं या बिलाच्या विरोधात आहेत. या बिलामुळे अनेक समस्या उद्भभणार असल्याचंही आझाद यांनी स्पष्ट केलंय.