Waqf Board Bill : अंबानींचं घर वक्फ बोर्डाच्या जमीनीवर; जितेंद्र आव्हाडांचा दावा…

Mla Jitendra Awhad Speak at Waqf Board Bill : देशाच्या संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचं चित्र आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे नेते तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपने हा मुद्दा चांगलाच लावून धरलायं. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विधेयकाला विरोध दर्शवत एक वेगळाच दावा केलायं. अंबानींचं घर हे वक्फ बोर्डाच्या जमीनीवर असल्याचा दावा आव्हाड यांनी केलायं.
धक्कादायक! सुनेनं केली सासूची हत्या…मृतदेह गोणीत भरला, जालन्यात भयंकर घडलं
तसेच हिंदु मंदिरांमध्ये अब्जो रुपयांचं सोन आहे हे सोनं सरकार ताब्यात घेणार का? यावर मला सरकारने उत्तर द्यावं, लोकांच्या धार्मिक विषयात जाण्याची गरजच नाहीये, सध्या संविधानाचं उल्लंघन करण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केलायं.
कुणाल कामराच्या अडचणीत आणखी वाढ; मुंबई पोलिसांची तिसरी नोटीस धडकली
आपण वक्फ बोर्डाला विरोध का करायचा?
आता आपल्याकडे दक्षिणेतील मंदिराकडे भारताला श्रीमंत करतील असं दुप्पट सोनं आहे. मग, आपण वक्फ बोर्डला विरोध कशाला करायचा? एकदा जमीन वक्फ करण्यात आली म्हणजेच समाजासाठी दान करण्यात आली, परत ती हस्तांतरित करण्यात येणार नाही. आता कायदा करायचा असेल तर असा करा की या जमिनीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, त्यांच्या वाड वडिलांनी वक्फला दान केलेल्या जमिनी आहेत. मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी दुरुपयोग केलायं असंही ते म्हणाले आहेत.