Kolkata Doctor Case : कोलकात्यात ट्रेनी डॉक्टर महिलेवरील बलात्काराच्या विरोधात (Kolkata Doctor Case) ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. काल मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त झालेल्या आंदोलकांनी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड केली. या आंदोलना दरम्यान वाहने आणि सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले. या भागात पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स हटवण्यात आले. हॉस्पिटलबाहेर उभ्या असलेल्या एका दुचाकी वाहनाला आग लावून दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला तसेच गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही केला.
Darshna Pawar Murder Case :आधी मध्यप्रदेश, कोलकाता नंतर चंदीगड असा लागला दर्शनाच्या मारेकऱ्याचा तपास
बलात्कार आणि त्यानंतर हत्येच्या घटनेविरोधात कोलकात्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलना दरम्यान जमाव रुग्णालयाबाहेर जमा झाला होता. यानंतर काही कळायच्या आत या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराचा मारा केला. नंतर या गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्जही केला. दंगल नियंत्रणात आणण्याचं काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही येथे तैनात करण्यात आले.
कोलकात पोलीस आयुक्त विनीत कुमार गोयल यांनी सांगितले की अफवा पसरवू नका. आम्ही प्रत्येक गोष्टीचा बारकाईने तपास करत आहोत. प्रत्येक व्यक्तीची चौकशी करत आहोत. पण अफवा आणि नागरिकांत संशय निर्माण केल्याने शहराचे मोठे नुकसान झाले आहे अशी खंत पोलीस आयुक्त विनीत कुमार गोयल यांनी व्यक्त केली. कोलकात्यात या निदर्शनात आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
माईक बंद केला, ममता बॅनर्जींचा संताप; नीती आयोगाच्या बैठकीतून वॉकआऊट
नेमकं काय घडलं होतं?
आरजी कर रुग्णालयातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरने सांगितले की आम्हाला रात्री 11 वाजता विरोध मार्चसाठी जायचे होते. पण आवारा बाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. त्यांच्याकडून जोरदार घोषणाही दिल्या जात होत्या. जमाव संतप्त झाला होता आणि आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. अचानक काय झालं माहिती नाही पण तोडफोड सुरू झाली. आम्ही आमच्या महिला टीमला जाण्यास आधीच सांगितलं होतं. टीम गेल्यानंतर जमावाने बॅरिकेट्स तोडून आत प्रवेश केला. त्यामुळे आम्हाला येथून पळून जावं लागलं. आम्ही शांततेच्या मार्गानेच जे काही करायचं होतं ते करत होतो पण काही जण बाहेरून आले आणि त्यांनीच हे सर्वकाही केलं.