सनरायझर्स हैदराबादवर कोलकाता नाईट रायडर्सचा ‘फायनल’ विजय; तिसऱ्यांदा जिंकली IPL ट्रॉफी

सनरायझर्स हैदराबादवर कोलकाता नाईट रायडर्सचा ‘फायनल’ विजय; तिसऱ्यांदा जिंकली IPL ट्रॉफी

Kolkata Knight Riders IPL Final 2024 Winner : आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये कोलकाताने हैदराबादवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. तब्बल १० वर्षांनी कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपल नाव कोरलं आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हाच निर्णय केकेआरच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवत त्यांना अवघ्या ११३ धावांमध्ये गुंडाळलं. त्यानंतर दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना केकेआर संघाने ११व्या षटकात केवळ दोन गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केलं. केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने अवघ्या २६ चेंडूत ५२ धावांची नाबाद सामना जिंकवून देणारी खेळी खेळली. त्याचबरोबर आंद्रे रसेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

 

५२ धावांची उत्कृष्ट खेळी

अंतिम सामन्यात केकेआर संघाच्या गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीनंतर संघाच्या फलंदाजांकडून अशाच खेळाची अपेक्षा होती. कोलकाता नाईट रायडर्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही ज्यामध्ये त्यांनी ११ धावांवर सुनील नारायणच्या रूपात पहिली विकेट गमावली, जो केवळ ६ धावा करत पॅट कमिन्सचा बळी ठरला. यानंतर फलंदाजीला आलेल्या व्यंकटेश अय्यरने रहमानउल्ला गुरबाजसह आक्रमक खेळी करत संघाची धावसंख्या पहिल्या ६ षटकांत १ गडी गमावून ७२ धावांवर नेली. या सामन्यात दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूत ९१ धावांची भागीदारी करून सामना पूर्णपणे एकतर्फी केला. गुरबाजच्या बॅटमधून ३९ धावांची खेळी पाहायला मिळाली. तर, व्यंकटेश अय्यर या सामन्यात संघाला विजेतेपद मिळवून देऊन परतला ज्यात त्याने ५२ धावांची उत्कृष्ट खेळी केली. हैदराबादसाठी या सामन्यात पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी गोलंदाजीत १-१ विकेट घेतली.

 

निर्णय चुकला

नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कने अभिषेक शर्माच्या रूपाने संघाला मोठा धक्का बसला. पहिल्या ६ षटकांचा खेळ संपेपर्यंत हैदराबाद संघाने ३ महत्त्वाच्या विकेट गमावल्या होत्या. यानंतर, धावसंख्या ६२ होईपर्यंत निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. येथून सामन्यात मोठी धावसंख्या करणं त्यांच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. सततच्या दबावामुळे केकेआरच्या गोलंदाजांनी हैदराबादचा डाव केवळ ११३ धावांवर रोखला. केकेआरकडून गोलंदाजीत आंद्रे रसेलने सर्वाधिक ३ विकेट घेतले, तर मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा यांनी २-२ विकेट्स घेतल्या, तर वैभव अरोरा, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनी १-१ विकेट घेतली.

 

एकही मैदानात टिकला नाही

या मागील सामन्यांमध्ये समोरच्या टीमला 200 ते 250 चं टार्गेट देणाऱ्या हैदराबाद संघातील एकही फलंदाज फार काळ मैदानात टिकला नाही. कोणत्याच खेळाडूने मोठी खेळी केली नाही. त्यामुळे हैदराबादला मोठा फटका बसला. आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची ही सर्वात कमी धावसंख्या होती. स्टार्कने गोलंदाजीत आपली कामगिरी चोख बजावत तीन षटकांत १४ धावा देऊन दोन विकेट घेतल्या पण अंतिम सामन्यात पॅट कमिन्सचे नेतृत्त्व कमी पडलं असं दिसून आल. तर दुसरीकरडे केकेआरकडून उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळालं. आंद्रे रसेलने २.३ षटकांत १९ धावांत तीन विकेट घेतल्या. तर, हर्षित राणाने चार षटकांत एका मेडनसह २४ धावांत दोन विकेट घेतल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube