Download App

बायको कुंभमेळ्याला गेली…नवरा संतापला, घटस्फोटासाठी थेट न्यायालयात पोहोचला

  • Written By: Last Updated:

Wife Goes To Mahakumbh Husband File Divorce : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात (Mahakumbh) पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी लोक येत आहेत. पण, एका नवऱ्याला त्याची बायको महाकुंभाला गेल्याने इतका राग आला की, त्याने थेट न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. एवढंच नाही तर, नवऱ्याचा त्याच्या बायकोचा अध्यात्माकडे असलेला कल आवडत नाही. घटस्फोटासाठी (Divorce) असे तीन खटले भोपाळ कुटुंब न्यायालयात पोहोचल्याचं समोर आलंय.

भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात काही विचित्र प्रकरणे समोर येत आहेत. यामध्ये पती त्यांच्या पत्नींच्या धार्मिकतेमुळे घटस्फोटासाठी अर्ज करत आहेत. गेल्या एका महिन्यात असे तीन प्रकरण समोर आले त. या प्रकरणांमध्ये, बायकांचा धर्माकडे वाढता कल घटस्फोटाचे कारण (Madhya Pradesh News) बनत आहे. एका प्रकरणात, एका बँक अधिकाऱ्याने पत्नीच्या महाकुंभाला जाण्यावर नाराजी व्यक्त केली अन् घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.

‘बदनाम करण्याचं षडयंत्र… त्याचं नाव मी मुख्यमंत्र्यांना सांगणार’; सुरेश धसांनी दिला इशारा

त्याने सांगितलं की, त्याचा नकार असताना देखील बायको धार्मिक यात्रांना जाते. गेल्या महिन्यातच ती वृंदावनहून परतली. तेव्हापासून तिने सिंदूर आणि टिकलीऐवजी चंदनाचा टिळक लावण्यास सुरुवात केली. यानंतर ती आता महाकुंभालाही गेली, परतल्यानंतर तिने रुद्राक्षाची माळ घालायला सुरुवात केली. बायकोच्या अशा बदलत्या दिसण्याने आणि वागण्याने त्याला अस्वस्थ वाटते. त्याच्या मित्रांसमोर त्याच्या पत्नीची थट्टा केली जाते . त्यामुळे तो तिला ऑफिस पार्टीलाही घेऊन जाऊ शकत नाही.

दुसऱ्या एका प्रकरणात पतीनं सांगितलंय की, पूर्वी त्याची पत्नी स्पर्धा परीक्षांची तयारी करायची, पण नोकरी न मिळाल्याने तिने पूजा अर्चना करायला सुरुवात केली. पत्नी धार्मिक गुरूंनी सुचवलेल्या विधी करण्यासाठी मंदिरात तासनतास घालवते. घरात त्यांचे व्हिडिओ देखील प्ले करते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य अस्वस्थ झालेत.

आघाडीत होणार बिघाडी? उद्धव ठाकरेंना काँग्रेस देणार मोठा झटका, राजकीय वर्तुळात चर्चा

या दोन्ही प्रकरणांमध्ये आणि आणखी एका प्रकरणात, पत्नींची वाढती धार्मिकता घटस्फोटासाठी आधार बनली. अशा प्रकरणांमध्ये, भोपाळ कुटुंब न्यायालयाचे समुपदेशक जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांचे नाते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. समुपदेशनाद्वारे, या जोडप्यांना एकमेकांच्या विचारांचा आणि धार्मिक प्रवृत्तीचा आदर करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. कौटुंबिक न्यायालयात अशा प्रकरणांची वाढती संख्या हे स्पष्ट करते की, आजकाल धर्मामुळे कुटुंबांमध्ये तणाव आणि वाद वाढत आहेत. हे शांत करण्यासाठी वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आणि संमतीची आवश्यकता आहे.

 

follow us